एक्स्प्लोर

Mumbai BEST Election Result: ठाकरेंना कसं हरवलं, देवेंद्र फडणवीसांची मदत कशी झाली, शशांक राव यांनी BEST निवडणुकीच्या यशाची इनसाईड स्टोरी सांगितली!

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. तर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही.

Mumbai BEST Election Result: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. या निवडणुकीतील 21 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शशांक राव पॅनेलने घवघवीत यश मिळवले. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागांवर यश मिळाले. मात्र, या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या पार्श्वभूमीवर शशांक राव यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. ब्रँड अनेक असतात. पण जो कामगार आणि जनतेच्या हिताचं काम करेल, तोच टिकतो. तुम्ही एकटे असाल तरी लोक तुम्हाला निवडून देतात. हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीने दाखवून दिले, असे शशांक राव यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शशांक राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे आभार मानले. 

आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. 1946 पासून आमची संघटना आहे. यामध्ये अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस या संघटनेचे अध्यक्ष होते, शरद राव या संघटनेचे सरचिटणीस होते. आमची संघटना कामगारांसाठी काम करते. मी भाजपमध्ये असल्याने त्या पक्षाचा विचार मानतो. कामगार संघटनांचा हेतू एकच असतो, ते कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतात. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कामगारांसाठी आम्हाला नेहमीच मदत केली आहे. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतो, असे शशांक राव यांनी सांगितले. 

Shashank Rao: शशांक रावांचा ठाकरे बंधूंना टोला

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी भाष्य करताना ठाकरे बंधूंनी म्हटले की, आम्ही कामगारांच्या हिताचं काम करतो. कोणीही एकत्र आलं तरी आणि त्यांनी कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचे म्हणतात. पण ते 9 वर्षे बेस्ट पतपेढीत होते. याशिवाय, ते 25 वर्षे बेस्ट समितीत होते. या काळात निवृत्त होऊन तीन वर्षांनतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळाली नव्हती. सुहास सामंत या कमिटीत होते तेव्हा कामगारांच्या ग्रॅच्युईटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतो, ते पैसाही ठेकेदारांना वाटण्यात आला. त्यामुळे सुहास सामंत यांनी इतरांवर आरोप करु नयेत, असे शशांक राव यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी 2017 मध्ये बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे आश्वासन पाळले नाही. बेस्टच्या स्वमालकीच्या 250 गाड्या शिल्लक होत्या. आम्ही 2019 साली एमओयू केला होता, बेस्टने स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या पाहिजे. शिवसेनेकडे कमिटी आणि महानगरपालिका असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही बेस्टसाठी एकही बसगाडी विकत घेण्यात आली नाही. उद्धव ठाकरे फक्त कॉन्ट्रॅक्ट देत राहिले, असा आरोप शशांक राव यांनी केला.

आणखी वाचा

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? 'या' गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget