एक्स्प्लोर

Sanjay Raut: 'प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो, हा मानवी स्वभाव...'; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही. हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीससुद्धा वेगळे नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई: आम्ही पंतप्रधानपदावर कधी चर्चा करत नाही आणि करण्याची गरज देखील नाही. कारण आमच्याकडे या पदासाठी खूप चेहरे आहेत. त्यातला एखादा चेहरा पंतप्रधान होईल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत. त्यांना सत्तेचा लोभ नाही. राहुल गांधींनी देशात नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा असल्याचं देखील संजय राऊतांनी सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. 

प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो-

प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही.प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीससुद्धा (Devendra Fadnavis) वेगळे नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जे सांगितले आहे ते शंभर टक्के सत्य असल्याचं संजय राऊत म्हणाले. 

मोदी-शहा यांना ते आवडलं नाही-

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती बसून मी दिल्लीत जाईन. दिल्लीत अर्थमंत्री होईल, दिल्लीत गृहमंत्री होईल आणि मी पंतप्रधान होईल असं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही.महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण फडणवीसांचं हे स्वप्न बहुदा मोदी आणि शहा यांना आवडलं नाही आणि स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतं, असं संजय राऊतांनी सांगितले.  मोठं स्वप्न जेव्हा फडणवीस पाहायला लागले, तेव्हा मोदी आणि शाह यांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं. यालाच मोदी आणि शाह यांची राजनीती म्हणतात, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाल की, उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत. त्यांना वेड लागलंय, मला नाही. कालपर्यंत ते वेगळ्याच भ्रमात होते. कालपर्यंत म्हणत होते की अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता.  आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला. उद्धव ठाकरेंनी नेमकं ठरवावं त्यांना नेमकं कोण शब्द दिला होता. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव म्हणाले. तुम्ही देश पाहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हापासून भाजप आणि आमच्यात चांगलं सुरू होतं. 2012 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मोदी घरी आले होते. 2014 मध्ये मोदी पीएम झाले तेव्हा वाटलं, आपलं स्वप्न पूर्ण झालं. पण अमित शाह अध्यक्ष बनल्यावर भाजपचा सूर बदलला. भाजपच्या बोलण्यात मग्रुरी दिसत होती. बाळासाहेब गेले, वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. माझ्यासोबत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला

ही बातमी वाचा : 

Uddhav Thackeray : फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Naigaon : नायगाव रेल्वे स्थानक प्रकरणातील पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget