देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


"सर्व तपशील वेळेत जाहीर करणार"; मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं वक्तव्य


CEC Rajiv Kumar on Electoral Bonds Data: SBI नं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निवडणूक रोख्यांची माहिती सादर केली आहे. याबाबत SBI नं सर्वोच्च न्यायालयात (13 मार्च) प्रतिज्ञापत्र दाखल करून संपूर्ण माहिती दिली. आता याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांचं वक्तव्य समोर आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी CEC जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पोहोचले आहेत. वाचा सविस्तर 


मका पाकिस्तानची पण डोकेदुखी भारताची, जागतिक बाजारात नेमकं काय घडतंय? 


Maize Price: केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी ऊसाच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत इथेनॉलसाठी मकेची (Maize) मागणी वाढली आहे. अशातच देशांतर्गत मक्याचे उत्पादन मागील पीक वर्षाच्या तुलनेत सुमारे 3 दशलक्ष टन कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतीय बाजारपेठेत (Indian Market) मक्याची किंमत जागतिक बाजारापेक्षा जास्त आहे. या परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला (Pakistan) मिळत आहे. कारण, जागतिक खरेदीदारांबरोबरच दक्षिण पूर्व आशियातील खरेदीदारांना पाकिस्तानी मका स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळं पाकिस्तानची मका खरेदीदारांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. वाचा सविस्तर 


Reliance Industries: मुकेश अंबानी Viacom18 मधील पॅरामाउंटचा 13.01 टक्के हिस्सा करणार खरेदी


Reliance Industries-Viacom18: रिलायन्स इंडस्ट्रीजनं एंटरटेन्मेट नेटवर्क (Reliance Industries Limited) व्हायकॉम 18 (Viacom18) मीडियामधील पॅरामाउंट ग्लोबलचा संपूर्ण 13.01 टक्के हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या कराराची किंमत सुमारे 4 हजार 286 कोटी रुपये असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर 


इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार, सरकारनं आणली 500 कोटींची नवीन योजना; कधीपासून घेता येणार लाभ?


Electric vehicles: इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी (two wheelers)  आणि तीन चाकी वाहनं (three wheelers) स्वस्त होणार आहेत. कारण, यासाठी सरकारनं  500 कोटी रुपयांची नवीन योजना आणली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी EMPS योजनेसाठी 500 कोटी रुपये जारी करण्याची घोषणा केलीय. ही योजना 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. वाचा सविस्तर