Maize Price: केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी ऊसाच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत इथेनॉलसाठी मकेची (Maize) मागणी वाढली आहे. अशातच देशांतर्गत मक्याचे उत्पादन मागील पीक वर्षाच्या तुलनेत सुमारे 3 दशलक्ष टन कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतीय बाजारपेठेत (Indian Market) मक्याची किंमत जागतिक बाजारापेक्षा जास्त आहे. या परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला (Pakistan) मिळत आहे. कारण, जागतिक खरेदीदारांबरोबरच दक्षिण पूर्व आशियातील खरेदीदारांना पाकिस्तानी मका स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळं पाकिस्तानची मका खरेदीदारांसाठी महत्वाचा मुद्दा आहे.
वाढत्या दरामुळं जागतिक बाजारपेठेत भारतीय मकेला कमी मागणी
जागतिक मक्याच्या बाजारात, विशेषतः दक्षिण पूर्व आशियामध्ये भारताच्या चढ्या भावाचा पाकिस्तानला फायदा झाला आहे. या पीक वर्षात जूनपर्यंत भरड धान्याच्या उत्पादनात घट झाल्याने इथेनॉल उत्पादनाव्यतिरिक्त पोल्ट्री आणि स्टार्च क्षेत्रातील मक्याच्या मागणीमुळे भारतातील देशांतर्गत मक्याच्या किमती जागतिक बाजारातील किमतींपेक्षा जास्त आहेत. त्यामुळं जागतिक बाजारपेठेत भारतीय मकेला कमी मागणी आहे. त्या तुलनेत पाकिस्तानची मका कमी दरात उपलब्ध होत असल्यानं त्या मकेला मोठी मागणी असल्याची माहिती मका व्यापाऱ्यांनी दिली.
जागतिक बाजारापेठेत मकेची किंमत का जास्त?
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, खरीप आणि रब्बी हंगामात मक्याच्या उत्पादनाचा अंदाज 32.47 दशलक्ष टन इतका आहे. जो गेल्या पीक वर्षात 35.36 दशलक्ष टन होता. या पिकाच्या हंगामातील उत्पादन खरीप तसेच रब्बी हंगामात कमी राहण्याचा अंदाज आहे. केंद्राने इथेनॉल उत्पादनासाठी ऊस वळवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळं मक्याची मागणी वाढली आहे. याशिवाय पोल्ट्री आणि स्टार्च क्षेत्रातूनही मक्याला मागणी वाढली आहे. देशांतर्गत किंमती चढ्या असल्यामुळं भारतीय मका जागतिक बाजाराबाहेर आहे.
पाकिस्तानची मका भारतापेक्षा स्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या मकेचा दर सध्या 2,150 रुपये प्रति क्विंटल आहे. ही किंमत सुमारे 260 डॉलर प्रति टन आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय मक्याची किंमत प्रति टन 300 डॉलर आहे, तर पाकिस्तानच्या मक्याची किंमत 240-50 डॉलर प्रति टन आहे. त्याचबरोबर इथेनॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या भरडधान्यांचे कमी उत्पादन, यामुळे इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मक्याची सरासरी किंमत सध्या 2,132 रुपये प्रति क्विंटल आहे, जी एका वर्षापूर्वी 2,039 रुपये प्रति क्विंटल होती.
'या' देशांकडून पाकिस्तानच्या मकेची खरेदी
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये चाऱ्याची मागणी कमी असल्यानं पीक चांगले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानची मका निर्यात 15 लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. व्हिएतनाम, मलेशिया आणि श्रीलंका हे सर्वाधिक खरेदीदार बनले आहेत. पाकिस्तानच्या मक्याच्या खरेदीदारांसाठी गुणवत्ता हा एक प्रमुख मुद्दा आहे. त्याची किंमत कमी असल्याने खरेदीदार खरेदी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, इथेनॉल निर्मितीसाठी मकेची होणार खरेदी; पण दर किती?