Reliance Industries-Viacom18: रिलायन्स इंडस्ट्रीजनं एंटरटेन्मेट नेटवर्क (Reliance Industries Limited) व्हायकॉम 18 (Viacom18) मीडियामधील पॅरामाउंट ग्लोबलचा संपूर्ण 13.01 टक्के हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या कराराची किंमत सुमारे 4 हजार 286 कोटी रुपये असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजनं एका एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स आणि पॅरामाउंट ग्लोबलच्या दोन सहाय्यक कंपन्यांमध्ये एकूण 4 हजार 286 कोटी रुपयांमध्ये पॅरामाउंट ग्लोबलद्वारे वायकॉम 18 मीडियाची 13.01 टक्के इक्विटी स्टेक खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे.
हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्सचा Viacom18 मधील इक्विटी स्टेक पूर्णतः डाइल्यूटेड बेसिसवर 70.49 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सध्या, रिलायन्सकडे Viacom18 चे अनिवार्यपणे Convertible प्रेफरेंशियल शेअर्स आहेत, जे 57.48 टक्क्यांच्या इक्विटी स्टेकच्या बरोबरीत आहेत.
दरम्यान, Viacom18 रिलायन्सच्या मालकीचे 40 टेलिव्हिजन चॅनेलचं नेटवर्क चालवतं. यामध्ये कॉमेडी सेंट्रल, निकेलोडियन आणि एमटीव्ही सारख्या लोकप्रिय ब्रँडचाही समावेश आहे.
पॅरामाउंटनं करार पूर्ण झाल्यानंतर Viacom18 ला त्याच्या कंटेंटचं लायसन्स देणं सुरू ठेवण्याचं मान्य केलं आहे. पॅरामाउंटचा कंटेंट सध्या रिलायन्सच्या JioCinema प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, भारतातील त्यांच्या टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग मीडिया मालमत्तेच्या संदर्भात रिलायन्सचे वॉल्ट डिस्नेसोबत यापूर्वी घोषित केलेल्या विलीनीकरणावर व्यवहार पूर्ण करणं अवलंबून आहे.