मोहोळ मतदारसंघात अजित पवारांना दे धक्का; शरद पवारांच्या तुतारीचे राजू खरे विजयी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी महत्त्वाचा आणि राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात यंदा चांगल्याच घडामोडी पाहायला मिळत आहे. पारंपरीक राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ मानण्यात येणाऱ्या या मतदारसंघात राजन पाटील यांचं वर्चस्व आहे. मात्र, हा मतदारसंघ राखीव असल्याने गत 2019 च्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या पाठिंब्याने येथे यशवंत माने (Yashwant mane) यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली अन् ते आमदार बनले. मात्र, यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे येथील गणितं बदलली आहेत. राजन पाटील व यशवंत माने हे अजित पवारांसोबत असल्याने महायुतीकडून त्याचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. तर, यशवंत मानेंना टस्सल देण्यासाठी शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादीकडे मोहोळमधील (Mohol) स्थानिक नेत्यांची घोडदौड दिसून आली. अखेर, राजू खरे यांना तुतारीकडून मैदानात उतरवण्यात आलं होतं. आता, निकाल हाती आल्यानंतर राजू खरे 30 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.
अजित पवारांकडून विद्यमान आमदार यशवंत मानेंना तिकीट देण्यात आलं. मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी राजू खरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे, येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे राजू खरे यांनी 30,232 मतांनी विजय मिळाला आहे. खरे यांना 125838 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ऐन निवडणुकीत अजित पवारांकडून त्यांना खुश करण्यात आलं आहे. त्यामुळे, मोहोळच्या राखीव मतदारसंघात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. महायुतीमध्ये ही जागा आजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून इतर नेते महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी खिंड लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा येथील मतदारसंघात पाहायला मिळत आहे. माजी आमदार रमेश कदम यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, एकनाथ शिंदे गटाचे उद्योजक राजू खरे यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. तर, माजी मंत्री लक्ष्मणराव छोबळे यांचे सुपुत्र अभिजित ढोबळे यांनीही या विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली असून तेही वरिष्ठ पातळीवरुन नेतेमंडळींच्या संपर्कात आहेत. अॅड.पवन गायकवाड, शिवसेनेचे नागेश वनकळसे, शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, कॉंग्रेसचे रॉकी बंगाळे आदी नेतेमंडळी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येते.
दरम्यान, ही जागा भाजपला सुटणार नाही हे लक्षात घेऊन संजय क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता जिल्ह्याला आहे. तर, महाविकास आघाडी व महायुती म्हणून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढली जात आहे. त्यामुळे, स्थानिक पातळीवर गणितं चांगलीच बिघडली आहेत.
2019 च्या विधासभेत काय झालं?
मोहोळ विधानसभा मतदारसंघात 2019 साली देखील हा मतदारसंघ राखीव राहिला. त्यामुळे, आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशवंत माने यांनी निवडणूक लढवली. तर शिवसेनेकडून नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली होती. येथील मतदारसंघात राजन पाटील यांचा पारंपरिक मतदार असून, राजन पाटील यांच्या पाठिंब्यामुळे यशवंत माने यांनी विधानसभेला तब्बल 21,699 मतांनी विजयी विजय मिळवला होता. माने यांना 90532 मतं मिळाली होती. तर, शिवसेनेच्या नागनाथ क्षीरसागर यांना 68,833 मतं मिळाली होती. रमेश कदम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यांना 23,649 मतं मिळाली होती. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मोहोळसह जिल्ह्याला आहे.
लोकसभेला कोणाला मताधिक्य, काय घडलं?
मोहोळ विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतो. यावेळी, सोलापूर लोकसभा निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. भाजपाकडून आमदार राम सातपुते यानी लोकसभेच्या मैदानात उतरवले होते. तर, काँग्रेसनेही तरुण चेहरा देत आमदार प्रणिती शिंदेंना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे, येथील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पूर्वीपासून जनसंपर्क राहिलेल्या या मतदारसंघात मतदारांनी प्रणिती शिंदेंना भरभरुन मतं दिली. लोकसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेना 63 हजारांचे मताधिक्य मिळालं आहे. प्रणिती शिंदेंचा 74,197 मतांनी लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकी देखील महाविकास आघाडीचं पारडं जड मानलं जातंय. मात्र, राजन पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या शब्दाला मतदारसंघात मोठं महत्त्व आहे. त्यामुळेच, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या उमेदवाराला त्यांचा यंदा पाठिंबा आहे.
हेही वाचा
विधानसभेची खडाजंगी: सोलापुरात 11 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती