एक्स्प्लोर

Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना धडा शिकवणं आमचा धर्म, पहलगाम हल्ल्यावर सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Mohan Bhagwat: शांतपणे नुकसान सहन करणं हे ही आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या सर्वांच्या हृदयात वेदना आहेत. आपण सारे संतापलो आहोत. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.' असे मोहन भागवत म्हणाले.

Pahalgam Terror Attack Mohan Bhagwat: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानवर संताप व्यक्त करत आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अहिंसा हा आमचा स्वधर्म आहे. मात्र, दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा देखील आमचा धर्म आहे,अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पहलगाम हल्ल्यावर निषेध व्यक्त केलाय. आम्ही आमच्या शेजारील देशाचं नुकसान नाही करत पण ते चुकीच्या दिशेनं जात असतील तर प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे. राजा आपलं कर्तव्य बजावणार असं रा. स्व संघाचे मोहन भागवत म्हणालेत. (Pahalgam Attack)

काय म्हणाले मोहन भागवत?

रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. देवाने त्याचा संहार केला. ही हिंसा नाही अहिंसा आहे. अहिंसा आपला धर्म आहे. पण अत्याचार करणाऱ्याला धर्म शिकवणं  अहिंसाच आहे. आम्हाला आमच्या शेजारील देशाचं नुकसान करायचं नाही. यानंतरही कोणी चुकीच्या रस्त्याने जाताना दिसलं तर राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं आहे. राजा त्याचं काम करेल.' असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

'धर्म आणि अधर्मातील लढाई' मोहन भागवत म्हणाले...

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हा हल्ला धर्म आणि अधर्म यांच्यामधील लढाई आहे, याची आठवण करून देतो. लोकांना धर्माबद्दल विचारण्यात आले आणि नंतर त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप  नाही. द्वेष आणि शत्रूत्व जसे आपल्या संस्कृतीत नाही. तसेच शांतपणे नुकसान सहन करणं हे ही आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या सर्वांच्या हृदयात वेदना आहेत. आपण सारे संतापलो आहोत. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.'

ते पुढे म्हणाले, रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्याला मारण्यात आले. कोणताही पर्याय उरला नव्हता. रामाने मारले पण त्यालाही सुधारण्याची संधीही देण्यात आली, जेंव्हा त्याने सुधारणा केली नाही तेव्हा त्याला मारण्यात आले. मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर आम्हाला कठोर उत्तराची अपेक्षा असल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीनेही बलवान असलं पाहिजे. जर ताकद नसेल तर पर्याय नाही पण जेंव्हा ताकद असेल तेंव्हा गरज पडेल तेव्हा ती दिसली पाहिजे.

 

हेही वाचा:

Prakash Mahajan On Sharad Pawar: महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे?, प्रकाश महाजनांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Embed widget