BMC Election: मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार: राज ठाकरे
Raj Thackeray On BMC Election: कोल्हापूर दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.
Raj Thackeray On BMC Election: कोल्हापूर दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलच्या प्रश्नावर बोलत असताना ते म्हणाले आहेत की, एखाद्या व्यक्तीला पद मिळते, मात्र त्याची ती पोहोच नसते, अशी टीका त्यांनी केली. तसेच सीमावादाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उफाळून आणला जातोय, असा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज राज ठाकरे म्हणाले आहेत की, कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. शिवसेना आणि वंचीत यांच्या युतीवर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, मी जेव्हा पक्ष स्थापन केला त्यावेळी महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यात झेंडे लागले. असंख्य गावात झेंडे लागले आणि अनेकांनी आपल्या गावात शाखा स्थापन केल्या. माझ्या पक्षाला 16-17 वर्ष झाली आहे. 2014 मध्ये भाजपच्या हातात संपूर्ण बहुमत आलं. मात्र या पक्षाचा जन्म 1952 मध्ये झाला. प्रत्येक गोष्टीला एक वेळ जातो, असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला. त्यावेळी सगळे म्हणायचे हा पक्ष मुंबईपुरता मर्यादित आहे. त्या शिवसेनेला 1966 नंतर 1995 साल उजेडावं लागलं मुंबई महापालिका हातात यायला, असं ते म्हणाले आहेत.
सीमावादाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सीमाप्रश्न अचानक कसा मधेच येतो. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीकडून आपलं लक्ष वळवायचं आहे का कोणाला? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावर दिल्लीत आता बैठकही झाली. त्यामुळे हा हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालय यावर निर्णय देईल. ते म्हणाले, मूळ बातमीपासून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे का? याचा शोध घ्यायला हवा. राज्यपालांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते अशा एका पदावर आहेत, म्हणून आपण सोडून देतो. या राजकारणात अशी काही लोक आहेत, ते जे काही पदांवर बसले आहेत. यातच असे अनेक माणसे आहेत, ज्याला पद मिळते, पोहोच येत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या: