एक्स्प्लोर

MNS Mira Bhayandar Morcha: मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग

MNS Mira Bhayandar Morcha: मिरा भाईंदरमध्ये मनसेच्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते.

MNS Mira Bhayandar Morcha: मिरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून (Balaji Hotel) या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे (Datta Shinde) यांनी मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. 

मीरा भाईंदरमध्ये आम्ही सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.  काल आम्ही शहरात रुट मार्च काढला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार दक्ष आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोणीही मोर्चाचं ठिकाण जे सांगितलं होतं, तिकडे कोणीही येऊ नका. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. ज्या व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने बेकायदेशीर कृत्य करतील, असा संशय आणि वाजवी कारण होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काहींना ताब्यात घेतलं आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था राखणयासाठी पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करावे. ज्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तिकडे नागरिकांना जमण्याचे आवाहन करणे, हे बेकायदेशीर कृत्य आहे. अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे  यांनी सांगितले.

 Mira Bhayandar News: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर कालपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काल रात्रभर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची धरपकड सुरु होती. त्यामुळे मनसेचा आजचा मोर्चा निघणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी: मनसेच्या अविनाश जाधवांवर मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी कारवाई, पहाटे साडेतीन वाजताच पोलिसांनी ताब्यात घेतलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget