एक्स्प्लोर

Raj Thackeray & Devendra Fadnavis: राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला

Raj Thackeray meets Devendra Fadnavis: वांद्र येथील ताज लँडस एन्ड येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याची चर्चा

Raj Thackeray & Mahayuti:  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण, गुरुवारी सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेलबाहेर पडले. यानंतर काहीवेळातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग येताना दिसला. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर काहीवेळातच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचले आहत. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी गेले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी सुरु झाल्याचे दिसत आहे. मनसेकडून आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे. या चर्चेनंतर राज ठाकरे हे आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीशी हातमिळवणी करण्याची शक्यता बळावली आहे.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीक होती. राज ठाकरे यांच्या मनसेसाठी महायुती जागा सोडेल, अशी चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभ्या असलेल्या माहीम मतदारसंघात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने 125 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही मनसेला सत्तेत वाटा देण्यात आला नव्हता. त्यामुळे महायुती आणि राज ठाकरे यांच्यात काहीसे अंतर निर्माण झाले होते. अशातच गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित ताकद पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. हीच गोष्ट ओळखून आता महायुतीने राज ठाकरे यांच्याशी वाटाघाटी करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राज ठाकरे-फडणवीस आणि संदीप देशपांडे-उदय सामंत यांच्या भेटीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sandeep Deshpande: उदय सामंतांच्या भेटीनंतर बाहेर येताच संदीप देशपांडे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली याची कल्पना मला नाही. मी एक प्रस्ताव घेऊन उदय सामंत यांच्या भेटीला आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरु करायचा आहे. त्यासाठी मी उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाहीत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

Uday Samant: दोन्ही भेटी आज झाल्या हा फक्त योगायोग: उदय सामंत

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे नवी मुंबईतील एका विकासकामासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते. मात्र, एकनाथ शिंदे सह्याद्रीला गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले. राज साहेबांच्या संदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भेटीची आम्हाला कल्पना नव्हती. या दोन्ही भेटी फक्त योगायोग होता. पण उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी घालायला सुरुवात केली होती तेव्हाच मी म्हटले होते की, राज ठाकरे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत. आज फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी तेच दाखवून दिले, असे उदय सामंत यांनी म्हटले. 

आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या फँटसीचा फडणवीसांमुळे विचका, शिवसेना-मनसे युतीचं फुल उमलण्यापूर्वीच अलगद खुडलं?

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget