एक्स्प्लोर

Amit Thackeray: वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; 'राजपुत्रा'च्या तात्यांना कानपिचक्या

Pune News: अमित ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांना हात घातला. मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामागची भूमिका त्यांनी मांडली. वसंत मोरे यांना टोला.

पुणे: वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केली. ते बुधवारी पुण्यात (Pune News) बोलत होते. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड असलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी अलीकडेच पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी अमित ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. यावर आता वसंत मोरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करुन महायुतीला पाठिंबा दिला असेल: अमित ठाकरे

यावेळी अमित ठाकरे यांनी मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याविषयी भाष्य केले. अमित ठाकरे यांनी म्हटले की, देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकारला 300 च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी अमित ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभेच्या जागांबाबतही भाकीत केले. उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजप लोकसभेला मनसेसाठी एक जागा सोडेल, अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढवतील, असे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ही शक्यता मावळली होती. 

राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची मुंबईत एकत्र सभा

यावेळी अमित ठाकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने प्रत्यक्ष प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा

'वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला', राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय काय म्हणाले?

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
Raj Thackeray : 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं... राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना मिश्किल टोला
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं... राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना मिश्किल टोला
Maharashtra Politics : मोठी बातमी! आधी बंद दाराआड गुप्त चर्चा, अन् नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर
मोठी बातमी! आधी बंद दाराआड गुप्त चर्चा, अन् नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget