Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्नभूमीवर भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील (Delhi) केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे मनसे ठरणार महायुतीचा नवा भिडू ठरणार या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीच्या (Possibility of BJP MNS Alliance) चर्चांना उधाण आलं आहे.


राज ठाकरेंना दिल्ली दरबारी बोलावणं?


मनसेसोबत (MNS) युती (Yuti) करण्यासाठी भाजपकडून (BJP) प्रयत्न सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे. राज ठाकरे यांना युतीत सामील करुन घेण्यासाठी केंद्रातील नेत्यांशी चर्चा सुरु असून राज ठाकरे यांनाही दिल्ली बोलावणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली, यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 


राज ठाकरेंनी महायुतीत सामील करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा


लोकसभेत महायुतीची ताकद आणखी वाढवण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचा भाजपचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चेचा प्रस्ताव आल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. राज ठाकरेंनी महायुतीत घेण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरु आहे. आशिष शेलार दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन राज ठाकरेंनी भेटले असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता मनसे आणि भाजप यांच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे.


भाजप आणि मनसे युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटी गाठी वाढल्यामुळे या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत.


दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींकडून मनसेला युतीसाठी प्रस्ताव असल्याची सुत्रांची माहिती आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाच्या या प्रस्तावाला कशाप्रकारे प्रतिसाद देते आणि राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


पाहा व्हिडीओ : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात तासभर चर्चा



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Raj Thackeray : आशिष शेलार दिल्लीचा निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला, मुंबईतील 6 जागांसाठी भाजपची रणनीती काय?