Raj Thackeray and Ashish Shelar Meet : भाजप (Shiv Sena) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी घेतली मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेच्या युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मनसे आणि भाजपमध्ये हातमिळवणी करण्यासाठीची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात भेट


मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चा रंगल्या आहे. मनसे महायुतीतील नवा भिडू ठरणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.


मनसे-भाजप युतीची चर्चा?


मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा रंगली आहे, अशातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आशीष शेलार यांची भेट झाल्याने मनसे-भाजप युतींच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशीष शेलार यांची भेट झाली आहे.


राज ठाकरेंना दिल्ली दरबारी बोलावणं?


महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांनासोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.


मनसे महायुतीतील नवा भिडू?


आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने बऱ्याचं गोष्टी पुन्हा समोर येत असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काही दिवसात भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चित्र स्षष्ट होईल असं सांगितलं जात आहे. कारण, निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर, भाजपला पाऊले उचलावी लागणार आहेत. 


भाजप-मनसे युतीबाबत येत्या काही दिवसात चित्र स्षट होईल


काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट करत म्हटलं होतं की, याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, यावेळी त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


मनसेसोबत युती करणार का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज' की बात