Uddhav Thackeray shiv sena Lok Sabha Election 2024  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) 18 जागा निश्चित झाल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचं (MVA)  जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीकडून (MVA) जवळपास 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उरलेल्या 8 जागांवरून तिढा कायम आहे.  


लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चेबांधणी आणि तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या 18 नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेल्या राज्यातील या 48 पैकी 18 जागा शिवसेना ठाकरे गट लढणार हे जवळपास निश्चित झाल्याचे चित्र दिसतंय. या जागांवर शिवसेना ठाकरे गट आधीपासून आगृही आहे, त्या सर्व 18 जागांवर  या लोकसभा समन्वयकाच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 


एकीकडे काकडे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या विविध लोकसभा मतदारसंघात  जाऊन जनतेशी संवाद साधत संघटनात्मक ताकद मजबूत करत आहेत.  तर दुसरीकडे लोकसभा समन्वयक  नियुक्त जाहीर करून निवडणुकीच्या संदर्भात  जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. 


लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे


जळगाव : सुनील छबुलाल पाटील


बुलढाणा : राहुल चव्हाण


रामटेक : प्रकाश वाघ,


यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम


हिंगोली : संजय कच्छवे


परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे


जालना : राजू पाटील


संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे


नाशिक : सुरेश राणे


ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर


मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस


मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी


मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर


मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे


रायगड : संजय कदम


मावळ : केसरीनाथ पाटील


धाराशीव : स्वप्नील कुंजीर


कोल्हापूर : सुनील वामन पाटील.


ठाकरेंनी जाहीर केलेल्या समन्वयकांच्या मतदारसंघात सध्या खासदार कोण?


जळगाव - उन्मेष पाटील
बुलडाणा - प्रतापराव जाधव
रामटेक - कृपाल तुमाणे
यवतमाळ - वाशिम - भावना गवळी
हिंगोली - हेमंत पाटील
परभणी - संजय जाधव
जालना - रावसाहेब दानवे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) - इम्तियाज जलिल
नाशिक-हेमंत गोडसे
ठाणे -राजन विचारे
मुंबई - उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) - मनोज कोटक
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
रायगड - सुनिल तटकरे
मावळ - श्रीरंग बारणे
उस्मानाबाद (धाराशिव) - ओमराजे निंबाळकर 
कोल्हापूर - संजय मंडलिक


आणखी वाचा :


MVA seat sharing Lok Sabha Election 2024 : जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस, 40 जागांवर सहमती!


MVA seat sharing : काँग्रेस 14, ठाकरेंना 15 , तर 8 जागांवरुन तिढा, 40 मतदारसंघातील मविआचं जागावाटप फायनल, कुणाला कोणता मतदारसंघ?


 MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?