एक्स्प्लोर

लक्ष्मण हाकेंनी अक्रस्ताळेपणा थांबवावा, मराठा-ओबीसी लग्नासंदर्भातील वक्तव्यावरूनही सुरेश धसांचा पलटवार

बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघात विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

बीड : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं असून ओबीसी आणि मराठा (Maratha) आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करत कुणबी मराठा-कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासन आदेश जारी केल्यानंतर बंजारा समाजाही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत एसटीमधून आरक्षण मागत आहेत. बंजारा समाजाच्या या मागणीला बीडमधील भाजप नेते आणि आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच, मराठा आणि ओबीसी समाजात एकमेकांचा होणारा द्वेष थांबला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) अक्रास्तळेपणा थांबवावा, असा सल्लाच आमदार धस यांनी दिला आहे. तर, मराठा-ओबीसी लग्नासंदर्भातील हाकेंच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं.

जिल्ह्यातील आष्टी मतदार संघात विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील कुंटेफळ तलाव, रेल्वे प्रश्न, सिंदफना पाणी प्रकल्प यासह इतर प्रकल्प प्रश्न मार्गी लावण्यात आल्याची माहिती आमदार धस यांनी दिली. त्यानंतर, राजकीय विषयावर बोलताना लक्ष्मण हाके यांच्या बीड दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणी कोणाला विरोध करावा हा लोकशाहीत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपापली बाजू मांडण्याचे काम नक्कीच केले पाहिजे. मात्र, हे करत असताना भाषा चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणीला मी पाठिंबा दिला आहे. इतर कोणी मागणी केली तर त्यांना देखील पाठिंबा देणार आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

हाकेंचा अक्रस्ताळेपणाचे प्रयत्न दिसतो

ओबीसी-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. दोन्हीकडून हे झाले पाहिजे, हैदराबाद गॅझेटियरचे रिझल्ट आणखी दिसायचे आहेत. काही जणांनी म्हणायचं आमचं सर्वच संपल आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यावर जास्त हलकल्लोळ न करता वेट अँड वॉच केला पाहिजे, असे माझं मत आहे. हाके साहेबांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना माझी एक विनंती आहे. प्रत्येकवेळी अक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो तो थांबवला पाहिजे. ते चांगल्या पद्धतीने बोलतात, आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असा टोलाही आमदार धस यांनी हाकेंना लगावला.

आंतरजातीय विवाह होत नाहीत का?

विधानसभेआधी लक्ष्मण हाके गेवराई मतदार संघात फिरत होते, गेवराईमध्ये तुमची मतं तुमच्या उमेदवाराला दिली आणि विजयसिंह पंडित यांना दांडके काढायचे, असं योग्य नाही. त्यांच्या पाठीमागे आणि बोलविते धनी कोण? हे तुम्हाला माहित आहे. लक्ष्मण हाके यांच्या लग्न करण्याच्या प्रस्तावालाही सुरेश धस यांनी उत्तर दिले. हैदराबाद गॅझेटचे आधी रिझल्ट येऊ द्या.. कुणबी नोंदीचे काही प्रमाणपत्र निघाले असले तरी मराठा समाजाची संख्या मोठी आहे. मी काहीतरी बोलून नवा वाद उठवू इच्छित नाही. यात माझे एक मत वेट अँड वॉच. लगेच सगळे मराठे कुणबीत गेले असे नाही. आंतरजातीय विवाह होत नाहीत का? ज्याचं ज्याला पटते त्याचे चालू आहे, असं म्हणत सुरेश धस यांनी हाकेंच्या लग्नासंदर्भातील वक्तव्यावरुन भूमिका मांडली.

हेही वाचा

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग..; संभाजीनगरमध्ये फोटोसह झळकले बॅनर, जोरदार चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात पावणे दोन कोटींची कमाई, प्रकरण न्यायालयात पोहोचलं
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात 1.75 कोटींची कमाई
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन

व्हिडीओ

Mumbai Crime Special Report : लोकलमधील वादानंतर प्राध्यापकाची हत्या, CCTV च्या आधारे आरोपीला बेड्या
Mumbai Local Crimeलोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्राध्यापकाची हत्या
Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात पावणे दोन कोटींची कमाई, प्रकरण न्यायालयात पोहोचलं
कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात 1.75 कोटींची कमाई
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
दुर्गभ भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान; देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
Embed widget