एक्स्प्लोर

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग..; संभाजीनगरमध्ये फोटोसह झळकले बॅनर, जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून भाजप महायुतीच्या 7 खासदारांना पराभव स्वीकारावा लागल्याचं दिसून आलं.

संभाजीनगर: राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha) मुद्द्यावरुन जोरदार वादंग उठलं असून सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई गाठली होती. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन काळात देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. दरम्यान, मुंबईतील आंदोलन काळात दोन्ही उपमुख्यमंत्री सक्रीय नसल्याची टीकाही केली जात होती. त्यामुळे, जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला जात होता. आता, छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात अशाच आशयाचे बॅनर झळकले आहेत. मग, टारगेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थळ हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी असून मराठवाडा हेच केंद्रबिंदू मानले जाते. त्यामुळेच, लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून भाजप महायुतीच्या 7 खासदारांना पराभव स्वीकारावा लागल्याचं दिसून आलं. तर, मनोज जरांगे पाटील हेही जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात सातत्याने बैठका व कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असतात. त्याच मराठवाड्यात आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बॅनर झळकले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले आहेत, मग टारगेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग लागले आहेत. महाराष्ट्रात 1960 पासून गेल्या 64 वर्षांच्या काळात आत्तापर्यंत एकूण 12 मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसचं का? असा सवाल या होर्डिंगवरुन विचारण्यात आला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते. मात्र, 2021 साली उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालविले, असेही बॅनरवर लिहिण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने वैजापूर शहरात हे होर्डिंग्ज लावल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत एकूण 12 मराठा मुख्यमंत्र्‍यांचे फोटोही बॅनरवर झळकल्याने हा बॅनर कोणी लावला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या घटनेचा शोध घेतला जात आहे.

राजघराण्यातून कागदपत्रे उपलब्ध होतील

मंत्रिमंडळ उपसमितीनुसार त्यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा विचार केला. त्यानंतर सातारा आणि औंध गॅझेट लागू करण्याचा विचार समोर आला आहे. याविषयी आंदोलनकर्त्यांकडून थोडा वेळ घेतला आहे. या गॅझेट विषयी उपसमितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेटविषयीची कागदपत्र ही जुनी जीर्ण आहेत, असे स्पष्ट केले होते. तरीही सर्व कागदपत्र राजघराण्याकडे असतील तर ती लवकर उपलब्ध होतील. मात्र, सरकारची भूमिका ही सातारा गॅझेटमधील सर्व कागदपत्र अधिकृत असावीत आणि हे सर्व ट्रान्सलेट कर त्याच अधिकृत माहिती समजावून घेणे आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. याबाबत माझा हैदराबाद गॅझेटमुळे अनुभव आहे. सातारा गॅजेटबाबत मंगळवारी होणाऱ्या उप समितीच्या बैठकीत हा सर्व विषय समोर येईल. त्यावेळेस, या गॅझेटविषयी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिकृत माहिती सांगतील, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.

हेही वाचा

उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत सरकारला लीगल नोटीस

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Embed widget