Sharad Pawar: शरद पवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन; पक्षासाठी बाप बेटे मैदानात, जयंत पाटील मुंबईत, मुलगा प्रतीक कराडात
Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कालपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे, त्यांचे पुत्र प्रतीक पाटील शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडात दाखल झाले.
Sharad Pawar in Karad: अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भक्कमपणे शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कालपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे, त्यांचे पुत्र प्रतीक पाटील शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडात दाखल झाले. शरद पवार यांच्यासह कराडमध्ये आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. जयंत पाटील मुंबईत थांबून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे.
जयंत पाटील अजित पवारांच्या बंडाळीवर काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या काही सदस्यांनी मंत्रीमंडळात जाण्याचा निर्णय घेतला असे दिसत आहे. मंत्रीमंडळात पक्षाच्या मान्यतेशिवाय त्यांनी सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा कार्यक्रम केला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने आणि विधानसभेच्या विधीमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने ठामपणे सांगतो की विधीमंडळ पक्ष आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने झालेल्या घटनेने व्यतीत होऊन आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात देत आहेत. झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवारांसोबत आहेत. ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्यक्त करत आहेत. मला खात्री आहे आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलावून घेण्यात आले त्यांच्या कशावर सह्या घेतल्या हे अजून आम्हाला कळलेलं नाही. पण त्यातील बरेच सदस्य जे टिव्हीवर त्या कार्यक्रमात दिसत होते त्या सर्वांनी शरद पवारसाहेबांशी बोलून आम्ही गोंधळलो होतो ही भूमिका मांडली आहे. काहींनी माझ्याशी संपर्क साधला. त्या सर्व आमदारांचे कन्फ्युजन आहे. पवारसाहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झाले आहे की आज घेण्यात आलेल्या कृतीला शरद पवारसाहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी यांची 5 जुलैला दुपारी एक वाजता बैठक आदरणीय शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बोलावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या