एक्स्प्लोर

Anil Deshmukh: महाराष्ट्रात 4 जूनला चमत्कार घडणार, अनेकजण परतण्याचा प्रयत्न करतील, अनिल देशमुखांनी विजयी जागांचा आकडाही सांगितला

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला. या निकालानंतर अनेकजण माघारी येण्याचा प्रयत्न करतील. मात्र, आम्ही कितीही मोठा नेता असला तरी त्याला परत घेणार नाही.

नागपूर: येत्या 4 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी महाराष्ट्रात चमत्कार घडेल. त्यानंतर आम्हाला सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा पक्षात परतण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांना कठीण काळात ज्यांनी धोका दिला त्यांना आम्ही पुन्हा पक्षात परत घेणार नाही. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही. परंतु, तो नेता लहान असो किंवा कितीही मोठा असो, त्याला पक्षात परत घ्यायचे नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्याप्रमाणावर निवडून येतील, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर 'विदर्भात चमत्कार होणार', असे बॅनर्स लावले होते. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्याकडून 'महाराष्ट्रात चमत्कार घडणार', असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महागाई, बेरोजगारी, शेतमालाला नसलेला भाव या मुद्द्यांवरुन महाराष्ट्रात भाजपविरोधात वातावरण होते. ही नाराजी लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने समोर येईल, हे आम्हाला माहिती होते, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

महायुतीला राज्यात 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल: अनिल देशमुख

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 35 पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. सध्या अजित पवार किंवा त्यांच्या गटाचे कोणतेही नेते माझ्या संपर्कात नाहीत. पण 4 जूननंतर ते प्रयत्न करतील. पण आमच्या पक्षाने ठरवले आहेत की, ज्यांनी शरद पवार यांची साथ कठीण काळात सोडली, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण कितीही लहान नेता असो किंवा कितीही मोठा नेता असो, त्याला परत घ्यायचे नाही, हे ठरल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटकपक्ष एकोप्याने लढले. 4 जूनला लागणाऱ्या निकालात आम्हाला चांगले यश मिळतील. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता फोडाफोडीचे राजकारण पाहत आहे. मुख्यमंत्री दुष्काळी परिस्थितीसंदर्भात बैठक घेतात. या बैठीकाला पाच पालकमंत्री उपस्थित नव्हते.  शेतमालाचा भाव, दुष्काळ, महागाई या मुद्द्यांवर सरकार बोलतच नाही. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जनतेची नाराजी दिसून येईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

लोकसभेच्या निकालापूर्वी अजितदादा गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची आज बैठक झाली. अजित पवार, सुनिल तटकरेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होणार झाली. या बैठकीला मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकत्यांना संबोधित केले.

आणखी वाचा

अजित पवारांनी संकेत दिले, मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित!, 10 जूनला शपथविधीची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines  10 PM TOP Headlines 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines  9 PM TOP Headlines 17/6/ 2024Pankaja Munde Speech Beed : लक्ष्मण हाकेंच्या मंचावर पंकजा मुंडे, ओबीसी आरक्षणावर स्फोटक भाषणPankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget