मंत्रिपदाचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही; सुप्रिया सुळेंचा मुरलीधर मोहोळांना सणसणीत टोला
Pune News: पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग पुण्यालाच व्हावा, कंत्राटदारांना नाही, असं म्हणत नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी मुरलीधर मोहोळांना टोला लगावला आहे.
Supriya Sule on Murlidhar Mohol: पुणे : पुण्याला (Pune News) मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सणसणीत टोला लगावला आहे. तसेच, सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळाल नाही? यावर प्रतिक्रिया देताना मैं दुसरो के घर में क्यु झांक्यू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार आमदार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. त्याबाबत मला माहीत नाही, मी दिल्लीत होते, कदाचित चर्चा असू शकते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, "काल दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली. पुढची 25 वर्षाचा रोडमॅपवर चर्चा झाली. राज्यात आणि देशात संघटनेची ताकत कशी वाढेल यावर चर्चा झाली. कार्यकर्ते आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, त्यासाठी त्यांचे आभार. कार्यकर्ता खचला नाही, लढत राहिला, त्याचा अभिमान आहे.
50 खोक इज नॉट ओके,धनशक्तीला जनतेनं नाकारलं : सुप्रिया सुळे
"संघटनेचे नवं धोरणं सांगू. मी घराबाहेर पडले की, तुम्ही असता, घरी जाताना देखील तुम्ही असता, तुम्ही घरी जात की नाही. 50 खोक इज नॉट ओके, असं कार्यकर्त्यांनी जनतेनं दाखवून दिलंय, धनशक्तीला जनतेनं नाकारलं आहे. ऑक्टोबरमध्ये धंगेकर पुन्हा आमदार होतील. देशाला दाखवून दिलं की अन्याय होऊ देणार नाही पुणे पॉर्शे केसमध्ये चांगलं काम केलं.", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
"पुण्यात प्रशासनच नाही, त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात. मात्र, अशा घटनांनी पुण्याचं नाव खराब होत आहे. पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे. गुन्हेगारीच्या विरोधात राष्ट्रवादीनं रस्त्यावर उतरलं पाहिजे. निकाल लागल्यापासून मी शांत झाले आहे. कारण आता जबाबदारी वाढली. पुण्यातल्या इन्व्हस्टमेट बाहेर जाणार नाही. यासाठी मराठा चेंबर्ससोबत बैठक घेणार, नोकऱ्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार आहे.", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना पूर्णपणे मिळाला नाही, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
दोन राष्टारवादी एकत्र येणार का? तसे बॅनर लागलेत? यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बॅनरनं देश चालत नाही. दुष्काळ, खासदार गुन्हेगारी आणि विधानसभेवर लक्ष देणार आहे. सरसकट कर्जमाफी व्हायला हवी, एवढीच अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, जम्मू काश्मीरमध्ये घटना घडली ही अत्यंत दुःखद, सगळ्यांना श्रद्धांजली देते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एकीकडे मोदी शपथ घेत होते आणि दुसरीकडे अटॅक सुरू होता, हे पहिल्यांदा घडलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.