छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या युती आणि जागावाटपा संदर्भात चर्चा आणि बैठका सुरु आहेत. अशात एमआयएम पक्षाने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी सांगितलं आहे. 


MIM इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार


एमआयएम महाराष्ट्रात इतर पक्षातील चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ही मोठी घोषणा केली आहे. एमआयएम भाजपला पाठिंबा देणार का या प्रश्नाला उत्तर देताना जलील यांनी स्पष्ट केलं आहे की, उमेदवार कोणत्याही पक्षाच्या असो चांगल्या उमेदवाराला पाठींबा देणार असल्यचं इम्तियाज जलील म्हणाले. 


एमआयएम किती जागा लढवणार?


एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं, आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहतोय कोणता पक्षाला कोणती जागा मिळणार, कुणाला उमेदवारी मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची यादी अजून फायनल झालेली नाही. आम्ही सहा जागा लढवण्याचा ठरवलं होतं, मात्र आता आणखी इच्छुकांची संख्या वाढत आहे. इच्छुकांची यादी घेऊन आज हैदराबादला जाणार आहे. त्यांची राजकीय माहिती, त्यांना यापूर्वी किती मते मिळाली आहेत, याचा डेटा असदुद्दीन ओवेसींना देणार आहे. ओवेसी यांनी एक खाजगी एजन्सी नेमली होती त्याचा अहवाल देखील लक्षात घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.


एमआयएम आणि वंचित युती होणार?


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडी असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी किंगमेकर होण्यासाठी एमआयएमसोबत युती करण्याचं आवाहन जलील यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारं खिडक्या सगळ उघडं आहे असंही जलील म्हणाले आहेत.


चांगल्या उमेदवाराला पाठींबा मग तो कोणत्याही पक्षाचा असो


एखाद्या पक्षाचे चांगले उमेदवार असल्यास त्याला आम्ही पाठिंबा देणार आहे. तो कोणत्याही पक्षाचे उमेदवार असू द्या. ते आम्हाला मानत नाहीत, पण ते चांगले उमेदवार असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करतोय. आम्ही मुस्लिम पक्षाचे असल्याचा डाग मिटवणार आहोत, असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य