मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतून (South Mumbai Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याविरोधात शिवसेनेकडून लढण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची माहगिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईतून महायुतीकडून मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित नाही, ही जागा शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुटण्याची शक्यता आहे.


उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी


उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय UBT पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एनडीएकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. एनडीएतील ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जाणार आहे. भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिवसेनेचे यशवंत जाधव निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.


मिलिंद नार्वेकरांना शिंदेसेनेकडून ऑफर (Milind Narvekar offered by Shiv Sena Shinde Group)


मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडल्यास ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ठाकरेंची काही गुपिते दडलेली आहेत, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या जाण्याने ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. नारायण राणे यांनी सेना सोडली, तेव्हा त्यांनी नार्वेकर यांच्यावर त्यांच्यात आणि नेतृत्वामध्ये संवादाची दरी निर्माण केल्याचा आणि त्यांचे फोन उचलत नसल्याचा आरोप केला.


कोण आहेत मिलिंद नार्वेकर? Who is Milind Narvekar


मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पक्षासाठी काम करत आहेत. मिलिंद नार्वेकर यांची ओळख ठाकरे कुटुंबातील हनुमान अशी झाली आहे. पक्षावर जेव्हा-जेव्हा संकट आलं तेव्हा नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. 


Milind Narvekar Mumbai : मिलिंद नार्वेकर यांना शिंदेंकडून लोकसभा लढण्याची ऑफर




Hingoli Lok Sabha : महायुतीला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन; जिंकण्यासाठी लढतोय, आता माघार नाही, शिवाजी जाधवांची भूमिका