मुंबई : ठाकरे (Thackeray) या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली, उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन (Mental Health) बिघडलं असून ते का बिघडलं याचा शोध घेत असल्याचं म्हणत भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली, तर तुमच्या शैलीत किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत उत्तर देणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका


भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे जी आपलं मानसिक संतुलन का बिघडलं आहे, याचा शोध आम्ही घेतोय. आम्हाला वाटतंय की, चतुर्वेदी यांच्यावरी कारवाई, आदित्य ठाकरे यांच्यावरील कारवाई या सगळ्यामधून तुमचा बोलता कोंबडा या गोष्टींमध्ये तुम्हाला बोलतंय आणि त्या तोंडून तुम्ही जी आक्षेपार्ह भाषा वापरताय. तीही राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल ज्यांना राज्यामधेच नाही तर देशामध्ये मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रेम आहे. 


बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत उत्तर देणार


फडणवीसांबद्दल अशाप्रकारची खालची भाषा तुम्ही केलीत, तर तुम्ही कोणत्या थराला जात आहात, हे आम्हाला कळतंय. ती भाषा आम्हालाही वापरता येते, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, त्यामुळे आम्ही ती भाषा वापरणार नाही, पण वेळोवेळी अशा भाषेचा वापर झाला, तर निश्चितपणे त्याचं जोरात उत्तर तुम्हाला तुमच्या स्टाईलमध्ये किंवा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत तुम्हाला द्यावं लागेल, असं मला वाटतंय, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


माजी मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व नव्हतं म्हणून पक्ष फुटले


प्रसाद लाड पुढे म्हणाले की, तुमच्या नेत्यांचे माजी मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व नव्हतं म्हणून पक्ष फुटले. घरात बसून संघटना चालवली, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हिन दर्जाची वागणूक दिली. मेन गेटने कधी गेले नाहीत, मातोश्रीच्या बाहेर कधी पडले नाहीत. मानेला पट्टा लावून बसले. पवारांना सोबत गेला तेव्हाच तुमचा पक्ष फुटला, जैसी करणी वैसी भरणी, देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व किती मोठं आहे आणि तुमचं कर्तुत्व किती आहे हे बघा, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sanjay Jadhav : केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही धनगर आरक्षण का मिळालं नाही? संजय जाधवांचं महादेव जानकरांना प्रश्न