Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election Result 2022) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा भाजपकडून राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला आहे.
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा पाठिंबा
गोव्यात सत्तास्थापनेच्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २१ जागांच्या आकड्यापेक्षा भाजप पक्ष सध्या थोडा मागे दिसत असला तरी गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अॅलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे. गोव्यातील 40 जागांवर आत्तापर्यंत भाजप 19 जागांवर (+6) आघाडीवर आहे. काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर असून आठ जागांचे नुकसान झाले आहे. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत, तर इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत. सावंत यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत या निवडणुकीत जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचे आभार मानले
अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश
.सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. विजयानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 2017 च्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने गोव्यात 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु 13 जागा जिंकूनही, भाजपने लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...