Devendra Fadnavis on Goa Election : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात अनेक मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले आहे. मनोहर पर्रिकरांशिवाय होणारी ही गोवा विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान आणखी कठीण होतं. पण भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी दिली आणि त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवल्याचे चित्र सध्या सध्या दिसत आहे. पाचही राज्यांचे निवडणुकांचे निकाल पाहता कॉंग्रेसला (Congress) आत्मचिंतनाची गरज आहे. तर शिवसेनेची (Shivsena) लढाई भाजपशी (BJP) नाही, 'नोटा' सोबत असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.


महाराष्ट्रात 2024 ची तयारी भाजपने केली आहे.


गोव्यात भाजपला विजय मिळाल्यानंतर आता इथे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. गोव्यात 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा मिळाला असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेची लढाई भाजपशी नाही, 'नोटा'शी आहे. गोव्यातील निकालाबाबत याच्या विजयाचं श्रेय हे जनतेचं आहे. महाराष्ट्रात 2024 ची तयारी भाजपने केली आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा


गोव्यात भाजपचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा पुन्हा एकदा चाललाय हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवडणुकीबद्दलची आतापर्यंतची राजकीय कारकिर्द कशी राहिली पाहुया...


महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्त्वातील पहिले सरकार स्थापन करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. ते त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. स्वतंत्र प्रभारी म्हणून पहिली जबाबदारी त्यांच्यावर पहिल्यांदा बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी आली. त्या राज्यात भाजपाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. दुसरी जबाबदारी गोव्याची आली आणि बहुमतात भाजपाचे सरकार आले. यापूर्वी गोव्यात सलग तीन निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे गोव्याचा स्वभाव आणि रस्ता न रस्ता त्यांना माहिती आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: लक्ष घातले. गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकार्‍यांना त्यांनी मुंबईला जेवायला बोलावले आणि लगेच सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय वादळं घोंगावत असताना सुद्धा एक पाय गोव्यात तर एक पाय महाराष्ट्रात अशी त्यांची स्थिती होती.


सुमारे दीड महिना ते गोव्यात तळ ठोकून होते.
गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्‍या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली. गोव्यातील 40 ही मतदारसंघात एक प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस यांना दररोज अपडेट देत असे आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती आखली जाईल. सुमारे 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या. अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा घेतल्या. बारकाईने काटेकोर नियोजन, प्रचंड आवाका, सूक्ष्म पातळीवर आखणी, संपूर्ण जबाबदारी स्वत: अंगावर घेणे, कुठेही कुणावर विसंबून न राहणे, सातत्याने बारीकसारीक बाबींचा फॉलोअप यामुळेच हा अपेक्षित निकाल लागू शकला. जेथे भाजपाविरोधी लाट आहे, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कमकुवत आहे, अशी वातावरण निर्मिती केली जात होती, तेथे सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून एक मोठा आणि अशक्य वाटणारा विजय देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणला आहे.


संबंधित बातम्या :