एक्स्प्लोर

Markadwadi : मारकवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये कोणाला लीड दिला? बावनकुळेंनी आकडेवारी मांडली

Markadwadi : मारकवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये कोणाला लीड दिला जाणून घेऊयात...

Markadwadi : गेल्या दोन आठवड्यांपासून मारकडवाडी गाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या (Maharashtra Politics) केंद्रस्थानी आलं आहे. मारकवाडी (Markadwadi) गावातील लोक सातत्याने बॅलेट पेपरवर निडवणुका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. गावाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आयोजन देखील केले होते. मात्र, हा प्रयत्न सरकारने धुडकावून लावला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या गावाला भेट देत ग्रामस्थांची मत जाणून घेतली आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील या गावाला भेट देणार आहेत. मारकडवाडी या गावातून ईव्हिएम (EVM) विरोधात लढा उभारला जात असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये मारकवाडीतून कोणाला लीड मिळालाय? याची आकडेवारी मांडली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब, मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं  डोकं ठिकाणावर येईल. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय?

शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी 2014, 2019 आणि 2024 ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा. 2014  मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना 533 मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना 664 मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना 294 मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना 979 मते मिळाली.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना 956 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना 395 मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना 1346 मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना 300 मतं मिळाली, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना 1021 मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना 843 मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना 1003 मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही.  यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं  डोकं ठिकाणावर येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? विधानसभेचं अध्यक्षपद पक्कं होताच राहुल नार्वेकरांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget