एक्स्प्लोर

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, विधानसभेला लवकरच राज्यात नवं राजकीय समीकरण?

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता राजरत्न आंबेडकर यांनीदेखील त्यांची भेट घेतली.

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून संपूर्ण राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत, असे जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले वेगवेगळे राजकीय नेते त्यांची भेट घेोत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली आहे. 

लोक महाविकास आघाडी,  महायुतीला आता कंटालळे

या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोक महाविकास आघाडी,  महायुतीला आता कंटालळे आहेत. सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. राज्यातील गोरगरीब सामान्य लोक विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात नवं समीकरण घडवून आणत आहोत. आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत, अशी माहिती जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी दिली. 

...अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत.

"महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत. त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. महायुती हटवली तर महाविकास आघडी येते. महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत  अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत," असं राजरत्न आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

राजरत्न आंबेडकर यांनी स्थापन केला नवा पक्ष

राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच राज्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरपीआय नावाने नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे आता ते राजकीय समीकरण जुळवू पाहतायत. तर राजकारण माझा प्रदेश नाही. पण राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यामुळे आम्हाला राजकारणात उतरावे लागत आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. 

फटका नेमका कोणाला बसणार?

दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांच्या भेटीपूर्वी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार? मनोज जरांगे कोणाशी हातमिळवणी करणार? जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केल्यास त्याचा फटका कोणाला बसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा :

Omraje Nimbalkar on Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना दिलेलं वचन पूर्ण करावं : ओमराजे निंबाळकर

Sambhaji Raje Chhatrapati and Manoj Jarange : मोठी बातमी : संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभेला एकत्र लढण्याच्या हालचाली

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget