एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil on Mahadev Munde Case : महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय सुट्टी नाही, कुणाला वाचवलं तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं लागणार; मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange Patil on Mahadev Munde Case : सुखी चाललेला संसार वनवासी करण्याचे काम ज्या लोकांनी केले त्याला आम्ही फासावर लटकवणार आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange Patil on Mahadev Munde Case : एकीकडे शनिवारी सर्वत्र राखी पौर्णिमेचा उत्सव पाहायला मिळत असताना महादेव मुंडे खून प्रकरणात (Mahadev Munde Case) न्यायाच्या लढाईत साथ देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राखी बांधण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी थेट अहिल्यानगरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधली. यानंतर महादेव मुंडे कुटुंबीय आणि जरांगे पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली.याआधी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी जरांगे पाटील यांना मदतीचे आवाहन केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत जरांगे पाटील यांनी थेट परळी मध्ये येऊन ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या एसआयटीमार्फत केला जात आहे. आता या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट इशारा दिलाय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ताई वेगळ्या दुःखात आहेत. त्यांना न्याय देणं हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. शेवटी तिचे पोरं उघड्यावरती पडले आहेत. सुखी चाललेला संसार वनवासी करण्याचे काम ज्या लोकांनी केले त्याला आम्ही फासावर लटकवणार आहे. कारण सोन्यासारखे लेकरं, सुखी  चाललेला संसार, त्यांच्या घरावरून उभा नांगर या लोकांनी फिरवला. त्यामुळे त्यांना फासावर घातल्याशिवाय सुट्टी नाही. त्या तपासात कुमावत साहेब आहेत. त्यामुळे आरोपी पाताळात जरी लपले, ते मंत्र्याचे असो खासदाराचे, आमदाराचे असो की कोणाचा पण असू द्या, पंकज कुमावत साहेब त्याला पाताळातून धरून आणणार आहेत आणि फासावरच लटकवणारच आहेत. ज्ञानेश्वरी ताई यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत, असे त्यांनी म्हटले. 

पंकज कुमावत ग्रेट माणूस

महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. याबाबत विचारले मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तपास कुमावत साहेब करत आहेत. त्यांची एसआयटी गठीत होऊन दोन-चारच दिवस झाले आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांना डिस्टर्ब होईल. त्यामुळे आपण सध्या हस्तक्षेप करू नये. त्यांना थोडे प्रयत्न करू द्या. त्यांना आरोपीपर्यंत जाऊ द्या. 29 ऑगस्टला मी सुद्धा मोकळा होत आहे. बीड जिल्हा उद्या सकाळी सुद्धा बंद करायचं म्हटलं तरी बीड जिल्ह्यातल्या मराठा आणि सर्व जाती धर्माचे लोक सज्ज आहेत. परंतु, त्यांच्या तपासात अडथळा निर्माण केल्यासारखे होईल, त्यामुळे आपण विश्वास ठेवू. मी कुणाचीही स्तुती करत नाही. पण, पंकज कुमावत हे ग्रेट माणूस आहेत. ते म्हणणार नाही की हे मंत्र्याचा पोरगं आहे की गुंडाचं पोरगं आहे. कुमावत हे गुंडाला खेटणारे आहेत.गुंडाशी चॅलेंज स्वीकारणे हे पंकज कुमावत यांना आवडते. त्यामुळे कसलाही गुंड असला तरी ते त्याला आतमध्ये टाकतीलच, असे म्हणत त्यांनी पंकज कुमावत यांची स्तुती केली.  

तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं लागणार

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आता सगळ्यांची जबाब घेतले जातील. ज्ञानेश्वरी ताई यांचा जबाब घेतला जाईल. ज्ञानेश्वरी ताई जे नाव सांगतील ते पंकज कुमावत साहेबांना अटक करावे लागणार आहेत. बीडच्या एसपींना अटक करावे लागणार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा अटक करावेच लागणार आहेत. जर गृहमंत्र्यांनी अटक केली नाही जाणूनबुजून जवळचा नेत्याचा कुणीतरी कार्यकर्ता आहे किंवा नेताच यात आहे, म्हणून जर टाळायचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं लागणार आहे, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. 

मनोज जरांगेंचं मुंबईतील मोर्चाबाबत महत्त्वाचं वक्तव्य

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेत असलेले मनोज जरांगे हे काल रात्री अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी 29 ऑगस्टला मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक घरातून एक गाडी जाणार असल्याचं सांगितलं. एबीपी माझाच्या माध्यमातून सांगतो, आता नाही तर कधीच नाही, ही शेवटची संधी आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

Beed Crime: वाल्मिक कराड गँगने दमदाटी केलेला व्हायरल व्हिडिओ कधीचा? आरोपी नेमका कोण? मोठी अपडेट समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
Embed widget