(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : गिरीश महाजनला वाटलं तोच हुशार आहे, पंधरा रुपयाचा बेल्ट, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange, at Jalna : "मी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सारखं फुकट खात नाही, त्याला मिरच्या दिल्या तरी तो खातो. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्या प्रमाणे करावी. गिरीश महाजनला वाटलं तोच हुशार आहे. पंधरा रुपयाचा बेल्ट. गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणतात सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही, तर एवढे जेज घेऊन अंतरवलीला कशाला आलात?"
Manoj Jarange, at Jalna : "मी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सारखं फुकट खात नाही, त्याला मिरच्या दिल्या तरी तो खातो. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्या प्रमाणे करावी. गिरीश महाजनला वाटलं तोच हुशार आहे. पंधरा रुपयाचा बेल्ट. गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणतात सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही, तर एवढे जेज घेऊन अंतरवलीला कशाला आलात? हे आरक्षण टिकणारे नाही तर मग छगन भुजबळ का विरोध करत आहेत? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तुमची एवढी जनता असती तर तुम्ही दंगली घडवल्या असतात. छगन भुजबळ गोंधळी पाहिजे होता त्याच्या गळ्यात असुड पाहिजे होता, तो आसूड माझ्या हातात आला असता तर असा झोडला असता", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील म्हणाले. जालन्यातील शांतता रॅलीत जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजप नेते गिरिश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला.
मनोज जरांगे काय काय म्हणाले ?
मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलीय. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी साठी हा संघर्ष सुरू आहे. आपण जातीवाद करत नाहीत तरी आपल्याला जातीवादी म्हणतात. आपल्यावर सरकारकडून अन्याय केला जातोय. या देशात आतापर्यंत सरकारी नोंदी कोणाच्याच सापडल्या नाहीत, या नोंदी फक्त मराठ्याच्या सापडल्या आहेत. मराठे 100-150 वर्षांपासून आरक्षणात आहेत.
छगन भुजबळचं शिका काही, तो कसा आव बळच आणतो. मराठ्यांना आता ओबीसीमधून आरक्षण मिळत आहे, सरकारला हैद्राबाद मध्ये 5 हजार पेक्षा अधिक पुरावे आढळले आहेत. भाजपचं सरकार आल की ते पहिल्याच आठड्यात देतो म्हटले, काँग्रेसचे आले की 15 दिवसात देतो म्हणतात, पण 70 वर्ष असच झुलवत ठेवलं.
माझ्या समाजाला आणि आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण आमची वाट नाही, राजकारण माझा आणि समाजाचा धंदा नाही. आपल्या जालना जिल्ह्याने राज्यात आरक्षणाचा संघर्ष अंगावर घेतलाय. न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळू लागलय, ते फक्त एकजुटीमुळे मिळणार आहे. काही आपल्यातील अतृप्त आत्मे आणि काही विचारवंत सरकारला मिळालेत. सरकार काहीना काही कारण शोधून काढतय.
माझ्या बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी कोणालाच पाडले नाही, तरी जातीयवादी म्हणतात. नेमके तेच ओरबडून पडले त्याला मी काय करू. काही पोट्ट्यानी असा शिक्का धरला की धरुनच पाडलं, घरी राहिलेले 10-20 हजार मत वाया गेली. राणे समितीचे 16 टक्के नंतर 13 टक्के दिले टिकले नाही, आणि आता 10 टक्के दिले. मराठ्यांशी दगा फटका केला तर पुन्हा पुन्हा लढायची माझी तयारी आहे. महविकास आघाडीचे येऊद्या की महायुतीचे येऊद्या कोणालाच मराठ्यांचे लेकर मोठे होऊ नये वाटतं.
इतर महत्वाच्या बातम्या