Manoj Jarange: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला  आता 3 महिने पूर्ण झाली आहेत. खंडणीपासून हत्येपर्यंतचं षडयंत्र, संतोष देशमुखांना झालेली पाशवी मारहाण आजही धडकी भरवणारी आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोषारोपपत्रानंतर मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) राजीनामा द्यावा लागला. खंडणी ते हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याने त्यांना सहआरोपी करा अशी मागणी आक्रमकपणे होत आहे. दरम्यान, अद्याप या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच फरार केल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोजक मनोज जरांगे यांनी केलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणीही जरांगेंनी केलीय. (Manoj Jarange)


तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंविरोधात सबळ पुरावे असल्याचं सांगत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका आदेशावर धनंजय मुंडे सहआरोपी होऊ शकतात. हे फडणवीसांना माहित असल्याचंही जरांगे म्हणाले.


काय म्हणाले मनोज जरांगे?


तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंची पूर्ण माहिती आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी होईल इतके सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत . मुख्यमंत्री साहेब खोटे बोलतात की त्याचे पुरावे सापडले नाहीत म्हणून त्याला काही करता येत नाही . 302 कलमाखाली धनंजय मुंडे येतील पण त्याला सरकार वाचवत आहे . फडवणीस साहेब म्हणायला पाहिजेत धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. एका तासात ते सहआरोपी होतील. एवढे पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत .


 



सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार


आता सुरेश धस यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आहे. कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस  कृषी विभागातील घोटाळ्याबाबत ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत. कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीत.  


हेही वाचा:


Nirmala Nawale : अजितदादा की दिलीप वळसे पाटील कोणत्या नेत्याचं काम जास्त आवडतं? कारेगावच्या सरपंच मॅडमचं थेट उत्तर