Nirmala Nawale : अजितदादा की दिलीप वळसे पाटील कोणत्या नेत्याचं काम जास्त आवडतं? कारेगावच्या सरपंच मॅडमचं थेट उत्तर
Nirmala Nawale : अजितदादा की दिलीप वळसे पाटील कोणत्या नेत्याचं काम जास्त आवडतं? कारेगावच्या सरपंच मॅडमचं थेट उत्तर

Photo Credit - abp majha reporter
1/10
Nirmala Nawale : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतात.
2/10
कारेगावच्या सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय आहेत.
3/10
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरांमध्ये आणि सभांमध्ये त्या उपस्थित असलेल्याही पाहायला मिळाल्या आहेत.
4/10
अनेकदा पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी स्टेजवरुन भाषणं केलेलंही पाहायला मिळालं.
5/10
दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली.
6/10
यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते दिलीप वळसे पाटील यांपैकी कोणाचं काम आवडतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
7/10
या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला नवले म्हणाल्या, अजितदादा पवार हे माझे प्रेरणास्थान आहेत, तर दिलीप वळसे पाटील साहेब माझे आदरस्थान आहे.
8/10
या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया निर्मला नवले यांनी दिलीये.
9/10
त्यामुळे दोन्ही नेत्यांपैकी एक नेता निवडण्यास निर्मला नवले यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं.
10/10
मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्या सातत्याने सक्रिय असल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत.
Published at : 08 Mar 2025 10:00 PM (IST)