एक्स्प्लोर

Rohit Pawar On Missing Link: मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पात मोठा घोटाळा; नवयुगा, ॲफकॉन्स कंपन्यांवर कारवाई करा, रोहित पवारांची मोठी मागणी

Rohit Pawar On Missing Link: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'आता इथून पुढे हा शेवटचा ट्रॅफिक असेल,' असे सांगत हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता.

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेसवे) अत्यंत महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या 'नवयुगा इंजिनिअरिंग' आणि 'ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' (Afcons Infrastructure) या कंपन्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Rohit Pawar On Missing Link)

आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले होते, याचे दाखले देत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'आता इथून पुढे हा शेवटचा ट्रॅफिक असेल,' असे सांगत हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. त्यांनी त्यावेळी राजकीय भूमिका मांडली होती, मात्र काल पुन्हा या मार्गावर मोठी ट्रॅफिक कोंडी (वाहतूक कोंडी) पाहायला मिळाली.(Rohit Pawar On Missing Link)

यापूर्वी मिसिंग लिंकवरील खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. तसेच एखादा प्रकल्प स्थिर होण्यासाठी 'एक पावसाळा जाऊ द्यावा लागतो,' असे त्यावरती मुख्यमंत्री बोलले होते. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले की, इथे केवळ शब्दांचा खेळ नको, तर कामाचा दर्जा (क्वॉलिटी) उत्तम असला पाहिजे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या या टनेलची (बोगद्याची) दुरवस्था झाली आहे. बोगद्यामध्ये क्रॅक (तडे) पडलेले पाहायला मिळाले असून, आतून पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. त्यामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प नसून 'भ्रष्टाचाराला लिंकिंग' करणारा मार्ग आहे, असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला.(Rohit Pawar On Missing Link)

Missing Link Mumbai Pune: 'ॲफकॉन्स' आणि 'नवयुगा' या कंपन्यांवर सरकारने तात्काळ कारवाई

'नवयुगा' या कंपनीचा 'व्हीएसआर' कंपनीशी संबंध आहे. यापूर्वी व्हीएसआर कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नव्हती आणि तरीही मिसिंग लिंकचा हा महत्त्वाचा प्रकल्प नवयुगा कंपनीला देण्यात आला. जर या संपूर्ण प्रकल्पात एवढा मोठा घोटाळा झाला असेल, तर 'ॲफकॉन्स' आणि 'नवयुगा' या दोन्ही कंपन्यांवर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Missing Link Mumbai Pune: साडेअठरा तासांच्या प्रयत्नांनंतर पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली

लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दिवसभर दरड कोसळून ठप्प झालेली पुणे-मुंबई मिसिंग लिंक (Missing Link) मार्गिका तब्बल साडेअठरा तासांनी खुली करण्यात आली. मात्र, सध्या केवळ दोनच लेनवरून वाहतूक सुरू आहे; कारण बोगद्याच्या वरून अद्यापही धबधब्यासारखे पाणी वाहत असून, त्यातून छोटे-छोटे दगडही खाली येत आहेत. त्यामुळे 'इथला धोका खरंच टळला आहे का?' असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (Maharashtra Rain news) काल दरड कोसळल्यानंतर मिसिंग लिंकवर १०० टन मातीचा ढिगारा खाली आला होता. अखेर साडेअठरा तासांच्या प्रयत्नांनंतर पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली करण्यात आली आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget