विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा (Mahayuti) प्लॅन ठरलाय. रात्री (8 ऑगस्ट) महायुती समन्वय समितीची मुंबईत बैठक झाली. यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
![विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? Mahayuti will start campaigning from 20th August meeting of Mahayuti in Mumbai regarding assembly elections विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/668686d476adcb06e3a2fc550366a2651723168326767339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vidhansabha Election Mahayuti Meeting : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केलीय. बैठका, चर्चा, संवाद यात्रा सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा (Mahayuti) देखील प्लॅन ठरला आहे. काल रात्री (8 ऑगस्ट) महायुती समन्वय समितीची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये राज्यात महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या महिनेच्या 20 तरखेपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होणार असल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सातही विभागांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार
रात्री मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. राज्यात महायुतीचे समन्वयचे मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. या महिनेच्या 20 तरखेपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होतील. या सातही विभागांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. आठवी आणि शेवटी जाहीर सभा मुंबईत होणार आहे.
प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा प्रयत्न
दौरा कमीत कमी सात दिवसाच आणि जास्त जास्त दहा दिवसाचा असणार आहे. प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. त्या मतदारसंघाचे स्थानिक नेते पदाधिकारी सभेमध्ये उपस्थित असणार आहेत. पाच ते दहा हजाराचा लोकांचा एक मेळावा घेण्यात येणार आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 20 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल असे लाड म्हणाले.
जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा, यासंदर्भात तिन्ही नेते बोलतील
जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही नेते यासंदर्भात बोलतील असे प्रसाद लाड म्हणाले. आमच्यामध्ये जागा वाटप संदर्भात कुठल्याही तिढा नसल्याचे ते म्हणाले. तिघांच्या सहमतीने एक आराखडा तयार केला जाईल. दिल्लीच्या नेतृत्वाखाली आमच्या सभा होण्याआधीच जागांच्या संदर्भात निर्णय झालेला असेल असंही लाड म्हणाले. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीच्या पक्ष असल्यामुळं सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी करते. केंद्राच्या निर्णयानंतर जागा जाहीर केल्या जाणार असल्याचे लाड म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली
उद्धव ठाकरे यांची एवढी लाचार झाली आहे की, त्यांना सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दारी जावून बसावे लागत आहे.
यापेक्षा वाईट परिस्थिती उबाठा शिवसेनेची काय असणार आहे, असं म्हणत प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी सत्तेसाठी एवढी लाचारी केली आहे, याचं आम्हालाही दुःख असल्याचे लाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)