मुंबई :भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या मतदानावरुन( Maharashtra Vidhan Parishad Election 2024) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Davne) यांनी हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचं म्हटलं. सत्ता कुठंपर्यंत पोहोचते, न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे दिसून येतं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारताना सगळ्या जगानं बघितलं आहे. अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिलं नव्हतं. गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख (ओ) यांनी देखील यावरुन हल्लाबोल केला आहे.


निवडणूक आयोग सालदार, गडी असल्यासारखं काम करतो?


निवडणूक आयोग पक्षपाती आहे का? हा प्रश्न निर्माण होणार आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांचा बटीक, त्यांचाच घरचा सालदार, गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होईल, असं अंबादास दानवे म्हणाले. 


पाहा व्हिडीओ



अनिल देशमुख काय म्हणाले?


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावरुन हल्लाबोल केला आहे. गणपत गायकवाड यांना एक न्याय देतात आणि आम्हाला एक न्याय दिला जातो. मला मतदान करू दिलं नव्हतं त्यामुळे आम्ही या सगळ्या विषयासंदर्भामध्ये दाद मागणार आहोत, असं देशमुख म्हणाले. 


आम्ही संपूर्ण प्रकरणी आमच्यावर झालेल्या अन्याय बाबत आवाज उठवणार आहोत. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यावेळी देखील निवडणूक होती त्यावेळी मी परवानगी मागितली होती की मला मतदानाची परवानगी द्यावी   मात्र कोर्टाने मला परवानगी दिली नव्हती. लोअर कोर्ट आणि हायकोर्टानं मला परावनागी दिली नव्हती. आता गणपत गायकवाड यांना कोर्टानं परवानगी दिली आहे. गणपत गायकवाड यांना परवानगी द्यायला नको होती. 


भाजपने मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांना परवानगी मागून घेतली आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. भाजपकडून कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर केला जात आहे, हे पाहतोय, असं अनिल देशमुख म्हणाले.


विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार : 


भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे  
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 
काँग्रेस : प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुरस्कृत : जयंत पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर 


संबंधित बातम्या :


Maharashtra Vidhan Parishad Voting : गणपत गायकवाड जेलमध्ये, शहाजीबापू रुग्णालयात, महायुतीची दोन मते कुणाचं गणित बिघडवणार?


Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा? समोर आली मोठी अपडेट