जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांना महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 


शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असतानाही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्याच्या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे (Chandrashekhar Attarde) हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. 


उन्मेष पाटलांचा उपोषणाला जाहीर पाठींबा 


हे सरकार शेतकऱ्यांना साथ देत नाही. तसेच आपल्या सहकारी पक्षालाही हे सरकार साथ देत नाही. या सरकारच्या विरोधात आमचा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं जाहीर करत महाविकास आघाडी नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. उन्मेष पाटील यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


मविआकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध फेको


दरम्यान, शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र ते अद्यापपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाही. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध फेको आंदोलन करून निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कापूस भावंतर योजनेचा लाभ देण्यात यावा. ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावी आणि केळी पीक विमा भरपाई तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते उन्मेष पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरे ढोरे सोडण्यात येतील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात साप सोडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांचं क्रॉस व्होटिंग? काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी, भाजप उमेदवारांना मतदान?


थोरल्या पवारांचं 'अब की बार 225 पार'; विधानसभेत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा, शरद पवार कोणता डाव टाकणार?