Vidhan Parishad Election 2024 : आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणे निश्चित आहे. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देणार? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा?
विधान परिषद निवडणुकीबाबत कुणाला पाठींबा देणार याबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दोन वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण त्यांनी आमच्या मतदारसंघात भरपूर निधी दिला आहे. मी स्वतः आणि राजकुमार पटेल शिंदे साहेबांसोबत मतदान करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच या निवडणुकीत शिंदे साहेबांचे एकही मत फुटणार नाही, असा विश्वासही बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे.
पक्षीय बलाबल जाणून घ्या
महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेना शिंदे गट 40 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; आज विधान परिषदेची निवडणूक, महाविकास आघाडीची वाढली धाकधूक