वर्धा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्रीपदारूनही दावे होवू लागले आहेत. त्यावर आता चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस करावं, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.


उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्री पद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सोबतच अपक्षाला उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस पाच होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी व्यक्त केली.


Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदाबाबत पुन्हा चर्चा करण्याचे शरद पवारांचे संकेत


दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल : बच्चू कडू


शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे असेच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, असंही मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन देशातल सर्वात मोठं आणि सर्वात जास्त संख्येत असलेलं आंदोलन आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचा वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे. कायदा मागे घेतल्यावर कोणाचं नुकसान होईल हे स्पष्ट करावं, असही कडू म्हणाले आहेत.


BLOG | काँग्रेस मंत्र्यांच्या विरोधानंतरही नाना पटोले कसे बनले प्रदेशाध्यक्ष? काय आहे निवडीमागे हायकमांडचा संदेश?


फडणवीसांना टोला..
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिडी शिवाय फासे पलटवू, असे वक्तव्य केले होते. यावर फडणवीसांना असं म्हटल्याशिवाय जमणार नाहीय. त्यांच्याकडील आमदारांची इकडे येण्यासाठी रांग लागली आहे. त्यांना ते आवरून ठेवायचं आहे, म्हणून त्यांना हे बोलत राहावं लागतंय, अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी दिली.


Bacchu Kadu plays Kabaddi | बच्चू कडू कबड्डी मैदानातही अव्वल! अवघ्या 20सेकंदात कबड्डीपटूंना केलं बाद