एक्स्प्लोर

Maharashtra Politics Crisis : 'माझा जन्म गोपीनाथ मुंडेंच्या पोटी...'; अजित दादांनी वाचली 'धनुभाऊची स्क्रिप्ट'

Maharashtra Politics Crisis : पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपप्रसंगी अशीच खंत बोलून दाखवली होती. 

Maharashtra Politics Crisis : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्याच जाहीर कार्यक्रमात काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर चांगलीच तोफ डागली. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? असं अजित पवार म्हणाले. ज्यातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शरद पवारांनी जे काही दिले ते आपल्याला मिळाले नसल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली होती. मात्र हीच खंत पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपप्रसंगी परळीमध्ये बोलून दाखवली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाल्यावर पहिल्याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. आता तुमचं वय झाले असून, तुम्ही कधी थांबणार की नाही? असा प्रश्न विचारला. तसेच शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तो पुन्हा मागे घेतल्याच्या निर्णयावरून देखील अजित पवारांनी टीका केली. सोबतच जर राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला होता कशाला? असा सवाल अजित पवार यांनी थेट जाहीर कार्यक्रमात शरद पवारांना केला. पण जशी भूमिका अजित पवारांनी मांडली तिच भूमिका पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडेंच्या बाबत मांडली होती.  

"माझा जन्म गोपीनाथ मुंडेंच्या पोटी झाला नाही”

बुधवारी झालेल्या बैठकीत ज्या पद्धतीने अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांना त्यांच्याजागी उमेदवारी मिळाली. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष वाढत गेला. पुढे धनंजय मुंडेंना विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला. याच पराभवाची सल धनंजय मुंडेंमध्ये बोचत होती.

दरम्यान, याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मध्ये शिवस्वराज्य यात्रा राज्यभर काढली. विशेष म्हणजे, या यात्रेचा समारोप परळीमध्ये झाला. या समारोपाच्या भाषणामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवारांप्रमाणे आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला होता. तसेच माझा जन्म गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही म्हणूनच, जे पंकजा मुंडे यांना मिळाले ते आपल्याला मिळाले नाही का? अशी खंत बोलून दाखवली होती. आता तशीच काही खंत अजित पवारांनी बोलून दाखवली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Omraje Nimbalkar News : ओमराजे 3 तास विमानतळाबाहेर आलेच नाहीत, दिल्लीवरुन परतल्यानंतर पुणे विमानतळावर मोठा ड्रामा! नेमकं काय घडलं?
ओमराजे 3 तास विमानतळाबाहेर आलेच नाहीत, दिल्लीवरुन परतल्यानंतर पुणे विमानतळावर मोठा ड्रामा! नेमकं काय घडलं?
Shivsena : शिंदेंसोबत सहा खासदार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास
शिंदेंसोबत सहा खासदार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Embed widget