Maharashtra Political Crisis: ''महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आपण त्यांना काय कमी पडू दिलं किंवा देण्यात चुकलो हे समजत नाही'', असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दक्षिण मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयात शिवसैनिकांना संबधोत करताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले, ''भाजपची नजर मुंबई महापालिकेवर आहे. एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो हे विसरू नका. बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल.''
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''आमच्याकडे विजयासाठी नवीन उमेदवार आहेत. ज्यांना विरोधात जायचे आहे, त्यांनी राजीनामे देऊन जावे. हिंमत असेल तर सर्व बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.
बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, ''संजय पवार यांना आम्ही राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी दिली, त्यापूर्वी ते सामान्य शिवसैनिक होते. महाराष्ट्राला सध्या असा मुख्यमंत्री लाभला आहे, ज्यांचं कशातही स्वार्थ नाही, सत्तेचा मोह नाही. असा मुख्यमंत्री कुठे मिळेल?''
उद्धव ठाकरे आपल्या जनतेची काळजी घेतात
कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे शब्द देतात ते पूर्ण करतात. ते आपल्या लोकांची काळजी घेतात. आम्ही प्रत्येक शिवसैनिकाला दिलेले वचन पूर्ण करतो. आता जे होईल ते चांगलेच होईल. शिवसेनेतून घाण गेली आहे. काळाच्या ओघात माणसं कशी बदलतात हे आपण पाहिलं आहे. सध्या सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेकडे लागल्या आहेत. पण आजपर्यंत जे काही केले ते महाराष्ट्रासाठी केले.''
इतर महत्वाच्या बातम्या:
- शिंदे गटाची नवी चाल, उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आता अपक्ष आमदारांकडून सादर; शिंदे सेनेला फायदा होणार?
- Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे
- Maharashtra Political Crisis: 'मी सुशिक्षित गुंड आहे, पोस्ट फडणाऱ्यांना सोडणार नाही', बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचा इशारा