Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडताना दिसत आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हर्चुअल बैठकीद्वारे पक्षातील कार्यकत्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते भावूक झाले आणि शिवसैनिक पेटले. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्यास आणि त्यांचे पोस्टर फाडण्यास सुरुवात केली आहे. याचेच पडसाद कोल्हापुरातही उमटताना दिसले. कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे जागोजागी लागलेले पोस्ट फाडले आणि काही पोस्टरला काळं ही फासलं आहे. यावरूनच क्षीरसागर यांना आता राग अनावर झाला आहे. त्यांनी पोस्टर फडणाऱ्यांना व्हिडीओच्या माध्यमातून थेट इशाराच दिला आहे.  

  


बंडखोरीविरुद्ध कोल्हापुरात शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष रवीकिरण इंगवले आणि कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांचे शहरात लागलेले पोस्टर फाडले आहेत. यावरच राग व्यक्त करत क्षीरसागर यांनी इंगवले यांना गंभीर इशारा दिला आहे. राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत की, बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतोय की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. पोस्टर फडणाऱ्यांना सोडणार नाही, असं ते म्हणाले आहेत. क्षीरसागर म्हणाले, ''माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही.''



क्षीरसागर पुढे म्हणाले की, ''वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल तर यांना पाठिशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढं लक्षात ठेव.” दरम्यान, 24 जून रोजी कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीत पोहचत शिंदे गटात सामील झाले. त्यांच्या बंडानंतर कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शिंदे गटाची नवी चाल, उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आता अपक्ष आमदारांकडून सादर; शिंदे सेनेला फायदा होणार?
Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे