Abdul Sattar on SC Hearing : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालासाठी आता काहीतासांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर यावरच बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी, चिन्ह आणि नाव ज्याप्रमाणे आम्हाला मिळालं, ते पाहता उद्याचा निकालही शंभर टक्के आमच्याच बाजूनेच लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आले असताना 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. 


राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, काहीही झालं तरी आमच्या या उठावाचा सोनेरी अक्षरात उल्लेख होणार आहे. निकाल आमच्या बाजूने लागला तरीही आमची सत्ता येणार आणि विरोधात लागला तरीही आमचीच सत्ता असणार आहे.  देशाच्या राजकारणात आमची जी काही परिस्थिती आहे, याची इतिहासात नोंद राहणार आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आणि उठावाचा देशातील अनेक राज्यात विशेष उल्लेख असणार आहे. त्यामुळे उद्या येणाऱ्या न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो. तर चिन्ह आणि नाव आम्हाला मिळालं, उद्याचा निकालही आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला आहे.


शंभर टक्के निर्णय आमच्याच बाजूने येणार 


ज्या 16 आमदारांच्या बाबत हा निकाल येणार आहेत, त्यात माझा देखील समावेश आहे. पण ज्यांना धाकधूक असते ते कमजोर आणि कमकुवत असतात. ज्यांच्याकडे हिंमत असते ते कधीच धाकधूक करत नाहीत. मी एकदा निवांत असून, निर्णय आमच्या सारखाच लागेल. जर निर्णय आमच्या विरोधात आला तरीही त्याचे स्वागतच करणार. लोकशाहीप्रमाणे आमच्याकडे 40 आमदार आहेत. मुख्यमंत्री देखील आमच्याच पक्षाचे आहेत. तर पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील आम्हालाच मिळाले आहे. त्यामुळे ही सर्व एकंदरीत परिस्थिती पाहता शंभर टक्के निर्णय आमच्याच बाजूने येणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. 


उद्याच्या निकालाकडे देशाचं लक्ष...


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics)  बदलवणारा हा निकाल असणार असला, तरीही या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या पक्षांतर बंदी कायद्यावर न्यायालय काय निकाल देणार हे महत्वाचे असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार किंवा जाणार यापेक्षा पक्षांतर बंदी कायद्याबाबत न्यायालय काय निरीक्षण नोंदवणार आणि यावर काय निकाल देणार याची देशभरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांचे लक्ष असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल; आतापर्यंतचा घटनाक्रम एका क्लिकवर