Maharashtra Political Crisis: राज्यच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. हा निकाल उद्या येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. अनेकजण तर्क लावत असून, उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा आम्ही तर्क लावला आहे. त्यामुळे असे झाल्यास ठाकरे गटाच्या त्या 15 आमदारांचे काय होईल याची आम्हाला चिंता लागली असल्याचा शिरसाट म्हणाले आहेत. 


उद्याचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे सरकार राहणार की, जाणार हे उद्याच कळणार आहे. पण त्यापूर्वीच संजय राऊत यांना काही माहित असेल तर याबाबत मला काहीही माहित नाही. अनेक लोकं वेगवेगळे तर्क लावत आहे. आम्ही देखील तर्क लावत आहे की, उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या त्या 15 आमदारांचे काय होईल याची आम्हाला चिंता लागली आहे. ते कधी घरी जातील याची देखील आम्हाला चिंता आहे. तसेच कोण-कोण आमच्या संपर्कात आहे आणि त्यांना आमच्या पक्षात घ्यायचे किंवा नाही याची आम्हाला चिंता आहे. त्यामुळे तर्क वैगरे याला काही महत्व नसते. उद्या निकाल येणार असून, सर्व काही खुलासे उद्याच होणार असल्याचे शिरसाट म्हणाले. तर उद्याचा निकाल आमच्या बाजूने यावा अशी इच्छा असून, सर्व कायदेशीर बाजूंचा विचार करूनच आम्ही उठाव केला होता असेही शिरसाट म्हणाले. 


अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नयेत...


अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार यांनी भाकर न फिरवता पलटवली आहे.  त्यामुळे अजीत पवार यांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न न पाहिल्यास त्यातच त्यांचे हित असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत. 


ठाकरे गटाचे आमदार पहिल्या दिवसांपासून संपर्कात


तसेच पहिल्या दिवसांपासून उरलेले ठाकरे गटाचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे. त्या 15 आमदारांपैकी एक सोडला तर इतर 14 आमदारांपैकी कोणी काही बोलतय का?, हे सर्व आमदार एका ठिकाणी एकत्र उभे राहिल्याचं कधी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते सर्व आमदार आमच्या संपर्कात असून, योग्यवेळी ते निर्णय घेतील असेही शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


 Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संकेत