एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : संजय राऊत शकुनी मामा तर उद्धव ठाकरे धृतराष्ट्र; संजय शिरसाट यांची खोचक टीका

Sanjay Shirsat : शिंदे गटाच्या याच अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली

Sanjay Shirsat  On  Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकताच अयोध्या दौरा केला आहे. तर त्यांच्या याच दौऱ्यात शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार देखील सहभागी झाले होते. दरम्यान शिंदे गटाच्या याच अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. तर त्यांच्या याच टीकेला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे शकुनी मामा असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे धृतराष्ट्र असल्याची खोचक टीका शिरसाट यांनी केली आहे. 

दरम्यान यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांना टीका करायला काय आहे. त्यांना म्हणावं तुम्ही एकदा अयोध्याला जा, एकदा अयोध्या काय आहे ते पाहूनच यावे. आमच्यापेक्षा याचं मोठं स्वागत काही होणार नाही आणि हीच यांची अडचण झाली आहे. त्यामुळे अयोध्येला न जाता आमच्यावर टीका काय करता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. वेगवेगळे मुद्दे काढून टीका करायची, आमदार कसे नाराज आहेत असे सांगायचं काम राऊत करत आहे. ज्याप्रमाणे महाभारतमध्ये शकुनी मामा होता, तसेच कलयुगामधील शकुनी मामा हे संजय राऊत असल्याचे शिरसाट म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंची भूमिका धृतराष्ट्र सारखी झाली असून, ते डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. त्यांना कळत नाही की, काय करावे, असं शिरसाट म्हणाले. 

स्थानिक लोकं देखील एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, अयोध्येला आम्ही यापूर्वी देखील एक-दोन वेळा गेलो होतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील आम्ही अयोध्या दौरा केला आहे. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आम्हाला सर्वकाही नियोजन करावे लागत होते. तसेच त्यावेळी एकनाथ शिंदे पुढाकार घेत होते. यंदा जेव्हा आम्ही अयोध्येत गेलो तेव्हा विमानतळापासून तर लखनऊपर्यंत सर्व अयोध्यानगरी सजलेली होती. तेथील स्थानिक लोकं देखील एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी होत होते. 

आम्हाला सुरक्षेची गरज नाही...

आम्ही कोणत्याही आमदाराने सुरक्षा मागितली नाही. कोणत्याही आमदाराने सुरक्षा द्यावी यासाठी साधा अर्ज देखील केला नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख यांच्या विचारावर चालणारे असून, आम्हाला सुरक्षेची गरज नाही. खरी भीती यांना असून, यांच्यामुळे शिवसेनेचा ऱ्हास झालेला आहे. यांच्या भुमिकेमुळे शिवसेनेत भांडण लागली, यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना खाली मान घालावी लागत आहे. या सर्वासाठी संजय राऊत सारखे लोकं कारणीभूत असल्याचं शिरसाट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ambadas Danve : खून, खंडणी प्रकरणातील आरोपींसोबत मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज :  10 AM :12 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaManoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहनRaj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget