Aditya Thackeray vs Nitesh Rane VIDEO: तिकडे कोण आहे?, नितेश राणे दिसताच आदित्य ठाकरे माघारी फिरले; म्हणाले, शी शी शी, कचरा...
Aditya Thackeray vs Nitesh Rane: विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पोहचलेल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचल्याचे समोर आले.

Aditya Thackeray vs Nitesh Rane: महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2025) सुरु आहे. सध्या अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु असून सत्ताधारी आणि विरोधाक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पोहचलेल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना डिवचल्याचे समोर आले.
मंत्री नितेश राणे विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी मागून आदित्य ठाकरे देखील माध्यमांसोबत बोलण्यासाठी येत होते. यादरम्यान, तिकडे कोण आहे?, असं आदित्य ठाकरे मीडिया स्टँडजवळ बघत बोलले. यावेळी नितेश राणे माध्यमांशी संवाद साधताना दिसले. नितेश राणे समोर दिसताच शी शी शी असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच सोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांना जाऊ नका...कचरा साफ करण्याचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांआधी नितेश राणेंनीही डिवचलं होतं-
पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर, तिथून ते निघत असाताना नेमकं आमदार आदित्य ठाकरेही समोर आले होते. त्यामुळे, राणे-ठाकरे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. लहान आवाजात.. ये चला.. चला..,असं म्हणत नितेश राणेंनी मिमिक्री केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
विधानसभेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई शंभूराज देसाईंना भिडले-
आज (15 जुलै) विधासभेत मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार राडा झाला. मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्याने 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडल आहे. ही ललक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी 2019 ते 2022 साली एकदा ही याबाबत तत्कालीन सरकारने बैठक घेतली नसल्याचं सांगितलं. यावरुन वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मंत्र्यांनी जे पत्रकात आहे, तेच सभागृहात सांगितलं. त्यांना चांगलं ब्रिफिंग मिळालं नसेल, असं वरुण सरदेसाई म्हणाले. तुम्हाला उत्तर ऐकायचं नाहीय का?, असं म्हणत शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील शंभूराज देसाईंच्या मदतीला धावले. छातीवर हात मारत लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय?, तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

























