Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates: पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57 टक्के तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41 टक्के
Lok Sabha 5th phase voting LIVE : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचं सर्वांचं लक्ष आहे.
कुलाबा येथे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप आणि सेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. कुलाबा येथील म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रकार घडला.
राहुल नार्वेकर मतदान केंद्रावर आले असता ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. सध्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई- पार्ल्यामध्ये मतदान प्रचंड संथ गतीने होत आहे. शहाजीराजे मार्ग मनपा शाळेत रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण होऊन परत जात आहेत.
सिडको परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाची दिवशी अनेक घडामोडी घडत आहेत. आता माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत दिवे हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप दिवे यांनी केला. त्यामुळे वाद झाला होता. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. तर दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
महाराष्ट्र सरासरी – 38.77
भिवंडी 37.06
धुळे -39.97
दिंडोरी – 45.95
कल्याण – 32.43
उत्तर मुंबई – 39.33
उत्तर मध्य मुंबई – 37.66
उत्तर पूर्व मुंबई – 39.15
उत्तर पश्चिम मुंबई – 39.91
दक्षिण मुंबई -36.64
दक्षिण मध्य मुंबई – 38.77
नाशिक -39.41
पालघऱ – 42.48
ठाणे – 36.07
मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज मतदानाची (Loksabha Election 2024) रणधुमाळी रंगताना दिसत आहे. अशातच आज धुळे मतदारसंघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. असे असताना धुळ्यातील एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. उन्हाच्या प्रचंड तडाख्यातही नागरिकांचा मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्रावर येऊन नागरिकांशी साधला संवाद साधला. तसेच बंद पडलेले ईव्हीएम मशीन तात्काळ बद्दलल्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज मतदानाची (Loksabha Election 2024) रणधुमाळी रंगताना दिसत आहे. अशातच आज धुळे मतदारसंघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. असे असताना धुळ्यातील एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. उन्हाच्या प्रचंड तडाख्यातही नागरिकांचा मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्रावर येऊन नागरिकांशी साधला संवाद साधला. तसेच बंद पडलेले ईव्हीएम मशीन तात्काळ बद्दलल्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. मोदींच्या आणि जय श्रीरामच्या घोषणा देत वाजे आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे दिसून आले. तसेच हेमंत गोडसे यांच् नावाच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजभाऊ वाजे मतदारसंघात आढावा घेत असताना ही घटना घडली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली. 02-धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.
02-धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे-
6 धुळे ग्रामीण – 31.39 टक्के
7 धुळे शहर – 27.12टक्के
8 शिंदखेडा -27.16 टक्के
114 मालेगांव मध्य – 33.28 टक्के
115 मालेगांव बाहृय – 26.00 टक्के
116 बागलाण – 27.45 टक्के
(ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे ग्रामीण – 31.39 टक्के
धुळे शहर – 27.12टक्के
शिंदखेडा -27.16 टक्के
मालेगांव मध्य – 33.28 टक्के
मालेगांव बाहृय – 26.00 टक्के
बागलाण – 27.45 टक्के
➡️धुळे-२८.७३
➡️दिंडोरी-३३.२५
➡️नाशिक-२८.५१
➡️पालघर-३१.०६
➡️भिवंडी-२७.३४
➡️कल्याण-२२.५२
➡️ठाणे-२६.०५
➡️मुंबई उत्तर-२६.७८
➡️मुंबई उत्तर पश्चिम-२८.४१
➡️मुंबई उत्तर पूर्व-२८.८२
➡️मुंबई उत्तर मध्य-२८.०५
➡️मुंबई दक्षिण मध्य-२७.२१
➡️मुंबई दक्षिण-२४.४६
Aaditya Thackeray : मतदानासाठी अनेक मतदान केंद्रावर मुंबईकर रांगेत उभे आहेत, मुंबईतील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीये.
मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघात 28.41 टक्के मतदान झालं आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक - २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण - २२.५२ टक्के
ठाणे - २६.०५ टक्के
मुंबई उत्तर - २६.७८ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के
Palghar Lok Sabha Elections : पालघर लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 31.07 टक्के मतदान झाले आहे.
नवी मुंबई शहरातील ठाणे आणि बेलापूर मतदारसंघांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे. मतदान हे सुरळीतपणे पार पडत असल्याची खात्री करून घेतली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नवी मुंबई शहरामध्ये नाही, शांततेत मतदार पडत आहे. निर्भीडपणे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन मिलिंद भारंबे यांनी केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई शहरामध्ये मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई शहरातील ठाणे आणि बेलापूर मतदारसंघांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे. मतदान हे सुरळीतपणे पार पडत असल्याची खात्री करून घेतली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नवी मुंबई शहरामध्ये नाही, शांततेत मतदार पडत आहे. निर्भीडपणे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन मिलिंद भारंबे यांनी केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई शहरामध्ये मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा सहकारी मतदान केंद्रावर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत होता. यानंतर अंबडच्या हद्दीत कार्यकर्त्यांच्या कुर्त्यांवर जय बाबाजी असा शब्द लिहिलेला आढळल्याने पोलिसांनी यावर आक्षेप घेतला होता. यामुळे शांतीगिरी महाराज नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतले? असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला आहे. मात्र बाबाजी हे उमेदवाराचे नाव नाही आणि चिन्ह देखील नाही, असा दावा शांतीगिरी महाराजांकडून करण्यात आला आहे.
Malegaon Lok Sabha Election: नाशिकमधील (Nashik Lok Sabha Election) मेहुणे गावातील ग्रामस्थांनी सोमवारी लोकसभेच्या निवडणुकीतील (Lok Sabha Election) मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला आहे. या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झाले नाही. (वाचा सविस्तर)
उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान?, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मतदानाचा हक्क बजावला. सविस्तर वाचा
पवई हिरानंदानी येथील बूथ क्रमांक १५७, १५८ च्या व्हॉटिंग मशिन काही वेळ पासून बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी या बाबत ट्विट करून स्थिती समोर आणली आहे. आता एक मशीन सुरू झाली असून १५७ बूथ ची मशीन अजूनही बंद आहे.
मालेगाव ( नाशिक ) : मेहुणे गावातील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, मतदान केंद्रावर अद्यापपर्यंत एकही मतदान नाही,
ग्रामस्थ मतदानावरील बहिष्कारावर ठाम, पाणीटंचाई, शेतीचे प्रश्न, अनुदान आदी प्रश्नावर गावाने टाकला आहे बहिष्कार.
शासकीय अनुदान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीचे प्रश्न आदी समस्या सोडविल्या जात नाही म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या गावातील तीन मतदान केंद्रावर अद्यापपर्यंत एकही मतदान झालेले नाही..विशेष म्हणजे या मतदान केंद्रावर उमेदवारांचे बूथ प्रतिनिधी देखील गावाने दिलेले नाही.
Lok Sabha election voting LIVE : लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह
आज धुळे शहरातील गरुड प्रायमरी स्कूल या ठिकाणी एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की यंदा जनता ही जागृत झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी आमदार डॉक्टर फारुक यांनी बोलताना सांगितले की नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करून बदल घडवायचा आहे
Maharashtra Lok Sabha Election: महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदारांनी हक्क बजावला दिंडोरीत सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले. मात्र आठ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी झाले आहे.
महाराष्ट्र सरासरी – 15.93 टक्के
1. भिवंडी – 14.79
2. धुळे – 17.38
3. दिंडोरी – 19.50
4. कल्याण – 11.46
5. उत्तर मुंबई – 14.71
6. उत्तर मध्य मुंबई – 15.73
7. उत्तर पूर्व मुंबई – 17.01
8. उत्तर पश्चिम मुंबई – 17.53
9. दक्षिण मुंबई – 12.75
10. दक्षिण मध्य मुंबई – 16.69
11. नाशिक – 16.30
12. पालघर – 18.60
13. ठाणे – 14.86
मुंबई उत्तर पश्चिममध्ये मतदान चांगलं झालं आहे. मुंबई उत्तर पश्चिममध्ये सकाळी अकरापर्यंत 17.53 टक्के मतदान झालं आहे.
गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकर्यांसह नेते मंडळी पोहचले मतदानाला
राज्यात कांद्याच्या प्रश्नावरुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच हीच चीड आज शेतकरी मतदार राजाने मतदान करताना देखील दाखवली आहे. गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यात अगदी बागलाणचे माजी आमदार दिपीका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेतला आहे. सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. तर यावेळी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
Piyush Goyal Vs Bhushan Patil: उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नरेश म्हस्केंना भरघोस मतदान करा, श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास. सविस्तर वाचा.
Mumbai Lok Sabha Election 2024 : आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांत मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले.
दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी 5.34 मतदानाची नोंद झाली आहे. इतिहासात दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू भागात मतदानाचा आकडा कायमच कमी राहिला आहे. त्यातही वरळीत अवघ्या 2.86 टक्के मतदानाची नोंद आहे. तर मलबार हिलमध्ये 8.15 टक्के मतदान झाले आहे.
Mumbai News : मुंबईच्या जे. जे. पोलीस ठाणे परिसरात धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबईच्या धर्मदाय संस्थेवर चालणारे साबु सिद्धी हाॅस्पिटल मुख्य प्रवेशद्वारावर मतदारांना धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन
जे. जे. पोलीस ठाण्यात अब्दुल रज्जाक मनियार विरोधात कलम 188, भादवी लोक प्रतिनिधित्व अधिनियम 123(3) महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 3 अंतर्गत गुन्हा दाखल, तर अंधेरी डि एन नगरमध्ये आचार संहिता सुरू असताना व्हाॅट्स अॅप ग्रुपवर महाविकास आघाडीचा प्रचार करणारा मेसेज केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
अंधेरी डि एन नगर पोलीस ठाण्यात मोहसिन हैदर नावाच्या आरोपीवर कलम 188 भादवी सह कलम 126 लोकप्रतिनिधित्व अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
त्यामुळे व्हाॅट्स अॅपवर मेसेज फाॅर्वर्ड करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Kalyan Lok Sabha Election : कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 5.39 टक्के मतदान झाले आहे.
Palghar Lok Sabha Elections: पालघर लोकसभेत मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.95 टक्के मतदान झाले आहे.
- नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क.
- मालेगावातील शुभदा हायस्कुलमधील पत्नी व मुलासह केले मतदान.
- धुळे लोकसभेसाठी केले मतदान ; मंत्री असून रांगेत राहिले उभे.
- उमेदवारी मागणे हा सर्वांचा अधिकार.
- वरिष्ठांच्या निर्णयाची अमलबजावणी करणे कार्यकर्त्यांचे काम.
- उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ८ जागा मिळणार.
- मंत्री भुसे यांनी अहिराणी भाषेतून केले मतदारांना मतदानाचे आवाहन.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आज मतदान प्रक्रिया पार पडत असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आपल्या जन्मगावी गोंदेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी हनुमान मंदिरात दर्शन करत व आईचे आशीर्वादघेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.जनता माझ्या पाठीशी असून मी नक्की निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- मेहुणे गावाचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार.
- मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 53, 54 आणि 55 या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान नाही.
- गावकऱ्यांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार.
- दिंडोरी लोकसभा मतदार संघातील मालेगाव तालुक्यातील आहे मेहुणे गाव.
- सकाळी सात वाजेपासून एकही मतदान नाही..
- तीनही मतदान केंद्रावर आहे एकूण 2757 मतदान.
- विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही नाही.
- पाणी प्रश्न, शेतकरी समस्या, गावाला दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही म्हणून बहिष्कार.
नाशिक मतदारसंघासाठी मतदान केंद्र २२८ वर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक मतदारसंघासाठी बॉईज टाऊन स्कूल येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. पत्रकारांना लाईव्ह कव्हरेज करण्यापासून रोखल्याने भारती पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. अधिकृत ओळखपत्र असूनदेखील पत्रकारांना का अडवले? असा सवाल त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला.
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. सकाळी 7 ते 9 पर्यंत महाराष्ट्र सरासरी 6.33 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील मतदानाची टक्केवारी
- भिवंडी - 4.86
- धुळे - 6.92
- दिंडोरी - 6.40
- कल्याण - 5.39
- दक्षिण मुंबई - 6.19
- उत्तर मध्य - 6.01
- उत्तर पूर्व - 6.87
- दक्षिण - 5.34
- दक्षिण मध्य - 7.79
- नाशिक - 6.45
- पालघऱ - 7.95
- ठाणे - 5.67
नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात 6.45 टक्के मतदान झाले आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 6.40 टक्के मतदान झाले आहे.
मुंबई उत्तर वायव्य लोकसभा मतदारसंघात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतदान केलं आहे.
उज्ज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती निकम आणि सून पूजा अनिकेत निकम यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. देशसेवा, विकास यासाठी आम्ही मतदान केलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Kalyan Lok Sabha Election : शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दरेकर यांना विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे आव्हान आहे.
मुंबईतील सहा जागांवर मतदान सुरु झाले आहे. मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. यामुळे कल्याणकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 मिनिट उशिरा धावत आहे. त्याच्या फटका कामावर जाणाऱ्या लोकांना बसला आहे. सकाळी लवकर मतदान करुन कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे. रेल्वे स्टेशन आणि परिसरात चाकरमान्यांसह प्रवाशांची गर्दी कल्याण रेल्वे स्थानकावर झाली होती.
Mumbai Lok Sabha Election : मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अक्षय कुमार, प्रशांत दामले, अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्याशिवाय, अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर, दिग्दर्शिका झोया अख्तर यांनीदेखील मतदानाचा अधिकार बजावला.
Nashik Lok Sabha Election: नाशिक- सिन्नर तालुक्यात दोन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड दोन तासांनंतर सुरु झाले आहे. साधारण 20 मिनिटं बंद ईव्हीएम होते .
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य येथील ए. टी. टी.हायस्कूल येथे आहोत. याठिकाणी मतदानाला सुरुवात झाली मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू झाले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तगडा लावण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून 18 उमेदवार आपले मत आजमावत असून मुख्य लढत ही भाजप महायुती व काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे.
North Mumbai Loksabha Election 2024: मुंबईसह देशभरात मतदारांच्या लांब रांग पाहून खूप आनंद वाटतोय. मुंबईत मतदार मोठ्या संख्येने मतदान करणार असं दिसून येत आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा जास्त मतदान होईल. जनता देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपला निर्णय देईल. ही निवडणूक माझ्यासाठी एक वेगळा आणि चांगला अनुभव होता. यावेळी मी लाखो लोकांच्या समस्या जाणून घेतला. आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं, हे खूप समाधानकारक आहे, असं उत्तर मुंबई लोकसभेतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी सांगितले.
18 व्या लोकसभेसाठी सोमवारी मतदान असल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासनाने आठवडे बाजार तसेच बाजार समित्यांमधील लिलाव बंद करण्याची सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितिसह 17 बाजार समित्या बंद राहणार आहेत.
दादरमधील मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांची गर्दी
वडिलांची उणीव जाणवली, प्रचार करताना दमछाक, पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिली; मतदानाला निघताना अमोल कीर्तिकरांनी मनातील भावना बोलून दाखवल्या. सविस्तर वाचा
ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपकडून होणाऱ्या पैसेवाटपाच्या मुद्द्यावर भाष्य.
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतदान केलंय.
Rahul Shewale: दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे हे मतदानाला निघण्यापूर्वी त्यांनी देवनार येथील आपल्या निवासस्थानी कुलदैवताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी त्यांचे औक्षण केले
उज्ज्वल निकम लवकरच मतदानासाठी घराबाहेर पडणार आहेत. त्याआधी कुटुंबीयांनी निकम यांचे औक्षण केले आहे. ते उत्तर मध्य मुंबईचे भाजपचे उमेदवार आहेत. लवकरच ते मतदान करणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वर्षा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे.
Palghar Lok Sabha Election : शिवसेना ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी मतदानाचा अधिकार बजावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी , बरेच लोक सोडून जाणं हे पहिल्यांदा पाहतोय, असं म्हटलं. मला असं वाटतं की माझे वडील तीन टर्म उमेदवार होते. त्यावेळी मी बॅक सपोर्ट देत होतो. यावेळी दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पडत होतो. नक्कीच दमछाक झालीय पण वडील सोबत नसले तरी त्यांच्या अनुभवाचे, मायेचे, मविआतील घटकपक्षाचे लोक माझ्या मागं उभं राहिले आहेत. विजय आमचाच होणार आहे, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.
Thane Lok Sabhe Election 2024 : ठाण्यात EVM मशीन बंद पडली असून अनेक मतदार परतून गेले आहेत. दिव्यांग कला केंद्र, जिजामाता उद्यानात मशीन बंद पडली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद पाहिल्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांचा विजय निश्चित आहे, असं मला वाटतंय. ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रचारात भाषेचा खालचा स्तर गाठला. त्यामुळे चार जूनला निकालाच्या दिवशी ठाकरे यांचा पक्ष खालून पाहिला दिसेल, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले.
Mumbai Lok Sabha Election Phase 5 Voting Live: रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी मुंबईतील एका मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान सुरू होण्याची वाट पाहिली आणि नंतर मतदान केलं. आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांवर मतदान होत आहे. अनिल अंबानी यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला.
यामिनी जाधव यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
North East Lok Sabha: भाजपचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
जो निवडून येईल तो आपला लोकप्रतिनिधी असं म्हणून वागावं, असं राम नाईक म्हणाले. लोकांनी मतदानासाठी लवकर निघावं, असं राम नाईक म्हणाले.
Mumbai Loksabha Election 2024: मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी गोरेगावमधील पहाडी हाय स्कूल मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर पश्चिम मतदारसंघात राम नाईक यांनी मतदान केलं.
Bhandup Polling Booth : भांडूपमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच रांगा
Shantigiri Maharaj: शांतीगिरी महाराजांनी मतदान केंद्रासमोर जमिनीवर बेलफुल टाकून मतदान केंद्राला वंदन केले . मतदान केंद्रात देखील नमस्कार करून प्रवेश केला.
Shantigiri Maharaj: त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक झाल्यानंतर त्र्यंबकेश्वराने मला आशीर्वाद दिल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे मत नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
आज महाराष्ट्रात लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात एकूण तेरा जागांवर मतदान होत आहे. मुंबईच्याही सहा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवर भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने येथून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलंय. येथे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात
South Mumbai Lok Sabha Election Voting 2024 : मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि महायुतीतर्फे यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत होणार आहे. दक्षिण मुंबईत आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदारराजाचा कौल आज मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यंदा आपली हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. तर यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार असून थेट दिल्ली गाठण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे मुंबादेवीचा आशीर्वाद कुणाला मिळणार? आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघात गुलाल कोण उधणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला लवकरच सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. पाहुयाच पाचव्या टप्प्यात कोणाची लढत कुणासोबत असणार...?
- मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
- मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) वर्षा गायकवाड (काँग्रेस) मधून निवडणूक लढवत आहेत.
- मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यामिनी जाधव (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
- मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) यांची अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.
- मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
- मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट) मिहीर कोटेचा (भाजप) येथून निवडणूक लढवत आहेत.
- कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.
- ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) नरेश म्हस्के (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
- भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) कडून निवडणूक लढवत आहेत.
- पालघर: हेमंत सवरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.
- धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) येथून शोभा दिनेश (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.
- दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप) निवडणूक लढवत आहेत.
- नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) हे राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
Maharashtra Lok Sabha Election Voting 2023 : महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेते-राजकारणी भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असतील.
Mumbai Lok Sabha Election Voting 2023 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 48 पैकी 35 जागांसाठी 4 टप्प्यात निवडणूक पार पडली. लोकसभेच्या 13 जागांसाठी 264 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील 6, ठाण्याचा 3, पालघरचा 1, नाशिकचा 2 आणि धुळ्याचा 1 मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक गोरेगाव मधील पहाडी हाय स्कूल मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले आहेत.
Mumbai Lok Sabha Election Voting 2023 : आज देशात पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदार राजानं दिलेला कौल आज मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे.
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
- दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई
- उत्तर मुंबई - पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
- उत्तर मध्य मुंबई - उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड
- उत्तर पूर्व मुंबई - मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील
- वायव्य मुंबई - रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर
Thane Lok Sabha Election : ठाण्यात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लढत होणार आहे.
चेंबूरच्या अणुशक्ती नगर मतदान केंद्रावर मतदानाची मॉकड्रिल पार पडली. मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ उडू नये म्हणून मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार.
Kalyan Lok Sabha Election: कल्याण लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळेत मतदानाला सुरुवात होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
Rahul Shewale : मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील. शिवसेना कुणाची यावरही निवडणुकीच्या माध्यमातून जनता शिक्कामोर्तब करेल, मविआबाबत जनतेच्या मनात रोष आहे, असे वक्तव्य राहुल शेवाळेंनी केले आहे.
Palghar Lok Sabha Election : पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजप, इंडिया आघाडी आणि बहुजन विकास पक्षातील उमेदवारांमध्ये प्रमुख लढत असणार आहे.
Piyush Goyal vs Bhushan Patil: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढाई होणार आहे.
मतदान हे कर्तव्य असले तरी देशात मतदानाचा टक्का घसरताना दिसत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संघटना याबाबत जनजागृती करताना दिसत आहे. मुंबईसह देशभरात आरोग्य क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या देव देश प्रतिष्ठान ने मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जो मतदार मतदान करेल त्यांना देव देश प्रतिष्ठानशी संलग्न असलेल्या घाटकोपर, ठाणे, बदलापूर येथील क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार मिळणार आहे. दि २६ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हे तपासणी शिबिर असणार आहे. डॉ. विनायक अवकीरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.वैभव देवगिरकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचा आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे. गेल्या काही दिवसांत या मतदारसंघात आक्रमक प्रचार झाला. मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. यावरुन प्रचंड राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती.
राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
वायव्य मुंबईत शिवसैनिक आमने सामने आले आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर तर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून अमोल कीर्तिकर रिंगणात आहेत.
मुंबईतील 6 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही मुंबईकरांसाठी विशेष ट्विट केलंय. सोमवार हा मतदानाचा दिवस आहे, मुंबईकरांनो घराबाहेर पडून मतदानाचा हक्क आणि जबाबदारी निभावा, असे आवाहन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांच्या ट्विटला 45 हजार लाईक्स मिळाले असून 9 लाख 23 हजार जणांनी हे ट्विट पाहिल्यांचं दिसून येतेय. तर, 4.9 हजार युजर्संने हे ट्विट रिट्विट केलंय. तर, बातमी लिहीपर्यंत 994 कमेंट त्यांच्या ट्विटवर पडल्या आहेत.
मुंबईतील 30 मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघात आज रोजी, 180 वडाळा विधानसभा मतदार संघ झोन 20 मधील बूथ क्रमांक 189 सेंट पॉल मुलांची शाळा येथे प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रियायडिंग ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या सुनील लक्ष्मण गवळी (वय वर्ष 56) यांना अचानक छातीत दुखून ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना भिवंडी लोकसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून आज कर्मचाऱ्यांना मतपेटीचे वाटप करण्यात येत आहे. भिवंडीत लोकसभा क्षेत्रात तीन महिन्यात 78 हजार 859 मतदारांची वाढ आहे तर 23 जानेवारी रोजी 20 लाख 8 हजार 385 मतदार नोंद होती. मात्र भिवंडी लोकसभा क्षेत्रात एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यासाठी 14,460 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून 936 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या पार पडणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
आज रोजी 30 मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघ, 180 वडाळा विधानसभा मतदार संघ झोन 20 मधील बूथ क्रमांक १८९ सेंट पॉल मुलांची शाळा ह्यावर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेले सुनील लक्ष्मण गवळी वय वर्ष ५६ यांना अचानक छातीत दुखून ते बेशुद्ध झाल्याने त्यांना के ई एम रुग्णालय येथे पोलिसांच्या मदतीने दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीचे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
भविष्यात मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आमदार अशा कुठल्याही पदाची अपेक्षा नाही..पक्ष जी जबाबदारी देईल ती मला मान्य राहील..आतापर्यंत जनतेने भरभरून दिले यावर मी समाधानी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवल्या दौऱ्यावर केले.. ..लोकसभा नाशिकसाठी दिल्ली येथून माझ्या नावाची चर्चा झाली..मात्र विलंब झाल्याने मी नकार दिला. माझ्या उमेदवारीसाठी मोदी - शाह यांनी विश्वास दाखविला. राज्यात महाविकास आघाडीला ३२ जागा मिळण्याच्या दाव्याची भुजबळानी खिल्ली उडविली. उद्या ४८ जागा भेटतील असेही मिश्किलपणे म्हणाले. महायुतीला जास्त जागा मिळतील व 'अबकी बार मोदी सरकार, इसमे मुझे कोई शक नही', अशा शब्दात विश्वासही व्यक्त केला.
मुंबईतील मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून, आम्ही त्यांच्या पक्षाला आमचा पाठिंबा देणार नसल्याचे मुंबईतील मुस्लिम सेवाभावी संस्थांचे म्हणणे आहे. राज्यातील पाचव्या टप्यासाठी उद्या मतदान होतंय. त्यापूर्वीच मुंबईतील मुस्लिम समाजात नाराजीचा सूर उमटलाय. जोगेश्वरी येथील मुस्लिम समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य एकत्र आले होते यावेळी त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे आता आमच्याकडे मतांसाठी का हात पसरतायेत..? असा प्रश्न विचारत त्यांनी उद्या होणाऱ्या मतदानाच्यावेळी सर्व मुस्लिम समाज “नोटा” ला मतदान करणार असल्याचे सांगितले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे लोकसभेत समाविष्ठ असलेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सोमवारी बंद राहणार आहे. एपीएमसी मार्केट मध्ये हजारोच्या संख्येने माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाची संख्या आहे. त्यामुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी उद्या एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे. मात्र, हे होत असताना मुंबईकरांना भाजीपाल्याचा त्रास होवू नये म्हणून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त भाजी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळ , कांदा - बटाटा, दाना आणि मसाला मार्केट दिवसभर बंद ठेवली जाणार आहेत.
दुपारच्या वेळी उन्हामुळे मतदान कमी होते, त्यामुळे सकाळी लवकर मतदान करा. सर्वांनी मतदान करा. नंतर सरकारने हे केलं, ते केलं म्हणण्यापेक्षा मतदान करा. सुट्टी आहे म्हणून फिरायला जाण्यापेक्षा मतदान करा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावा. टाटा, बिर्ला या सर्वांना एकच मतदान देण्याचा अधिकार दिला आहे आणि झोपडपट्टीतील नागरिकांनाही एकच मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल. लोकसभेच्या चारही मतदारसंघात मतदानासाठी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. आज शेवटचे प्रशिक्षण पूर्ण होऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आवश्यक साहित्यासह रवाना होतील.
निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 22 हजार 44 मतदारांनी आपल्या टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार 513 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 54 लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात आली आहे. मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती
मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 हजार 353 एवढी मतदार केंद्रे असून आज सर्व मतदान पथके मतदान यंत्रासह रवाना होतील.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिल ते 6 मे 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली.
एकूण चार लोकसभा मतदारसंघात 87 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात 26- मुंबई उत्तरमध्ये 19, 27- मुंबई उत्तर पश्चिम 21, 28- मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20, तर 29- मुंबई उत्तरमध्ये 27 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 48 हजार 383 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 116, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 263 आहे.
या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावली, पाणी, एअर कुलर/पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
येत्या काही तासांमध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असून, जयत तयारी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. मुंबईतील मतदानाच्या अनुषंगाने आता मतदान साहित्य हे मतदान केंद्रावर जाण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरचे साहित्य, ज्या केंद्रातून वाटप होत आहे.
राज्यात पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान हे २० मे रोजी पार पडणार आहे. त्यात मुंबईतील ६ जागंसाठी मतदान होणार आहे. मुंबईत होणार्या मतदानासाठी मुंबईत २ हजार ५२० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना भिवंडी लोकसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून आज कर्मचाऱ्यांना मतपेटीचे वाटप करण्यात येत आहे. भिवंडीत लोकसभा क्षेत्रात तीन महिन्यात 78 हजार 859 मतदारांची वाढ आहे तर 23 जानेवारी रोजी 20 लाख 8 हजार 385 मतदार नोंद होती. मात्र भिवंडी लोकसभा क्षेत्रात एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यासाठी 14,460 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून 936 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या पार पडणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
पालघर: देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीच मतदान उद्या पार पडणार असून यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. मतदान कर्तव्यावर तैनात असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना आज मतपेट्यांचं वाटप करण्यात येत असून हे सर्व साहित्य घेऊन नेमलेल्या वाहनांमधून आपल्या मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. पालघर लोकसभेसाठी 21 लाख 48 हजार 850 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार ३,३८,५४१ मतदार असून यासाठी ३४८ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून जवळपास १८०० अधिकारी आणि कर्मचारी हे आपलं कर्तव्य पार पाडणार आहेत. या मतदान केंद्रांपैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. २,५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान साहित्य ज्या ठिकाणी वाटप केले जाते आणि हे कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत.
पाचव्या टप्प्यात पालघर मध्ये देखील मतदान होणार असून पालघर 22 या अनुसूचित जमाती मतदारसंघात 21 लाख 48 हजार 850 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . यामध्ये 11 लाख 25 हजार 209 पुरुष मतदार 10 लाख 23 हजार 80 स्त्री मतदार तर 225 तृतीयपंथी मतदार असून यासाठी जिल्ह्यात एकूण 2270 मतदान केंद्र असणार आहेत . ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 13921 कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात असतील . 20 तारखेला सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे . या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे .
भायखळा येथील जिजामाता उद्यानात काम करणाऱ्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
जे कर्मचारी सकाळी लवकरच वेळेत येतात त्यांना दुपारच्या वेळेत मतदानासाठी सुट्टी देण्यात आली असून जे लोक दुपारच्या वेळेत येतात त्यांना सकाळी मतदान करून अर्ध्या दिवसांनी कामावर रुजू होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सज्ज झाले आहेत. सुमारे ४ हजार पोलिसांच्या बंदोबस्तासह नवी मुंबईतील मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. नवी मुंबईत एकूण १४६ मतदान केंद्र आहेत. या मध्ये ऐरोली विधानसभा मतदार संघात ७४ मतदान केंद्र आणि ४३२ बुध आहेत. तर बेलापूर विधानसभेत ७२ मतदान केंद्र आणि ३८६ बुध आहेत. ठाणे लोकसभेत एकूण २५ लाख लाखाच्या वर मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग , राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहे.
राज्यातल्या पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे .कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 तारखेला मतदान होणार आहे .या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सज्ज झालाय . कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार आहेत . निवडणूक अधिकाऱ्यांसह महापालिका संबंधित शासकीय यंत्रणांकडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचा आवाहन करण्यात आलंय . कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11000 कर्मचारी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह एस आर पी एफ, होमगार्ड अशा एकूण 3000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे . आज सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप सूरु करण्यात आले .हे साहित्य घेऊन आज हे अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत .त्यानंतर त्या त्या मतदार केंद्रावर हे साहित्य सज्ज करण्यात येणार आहे .
कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 28 उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात आहे .उद्या या उमेदवारांची परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल चार जून रोजी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 18 हजार 958 मतदार ,आहेत तर एकूण 1960 मतदान केंद्र आहेत .निवडणुकीत विविध शासकीय यंत्रणांची 11 हजार कर्मचारी काम करत आहेत तर कायदा व्यवस्था राखण्यासाठी देशांच्या देखील सज्ज झाली असून 200 पोलीस अधिकारी 1800 पोलीस कर्मचारी 950 होमगार्ड पाच एस आर पी एफ सी ए पी एस च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत .
कल्याण लोकसभा मतदारसंघातील 1960 मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना झाले या मतदान केंद्रांवर उद्याची तयारी सुरू झाली आहे . उद्या सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात होईल . मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नये त्याकरता निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर चौख व्यवस्था ठेवली आहे. त्याचप्रमाणे मतदाराला आपलं नाव शोधता यावे याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अल्फाबेटिकल रोल लोकेटर ठेवण्यात आले आहे या माध्यमातून मतदार आपले नाव शोधू शकेल त्याला मतदान करणे सोपे जाईल .
पार्श्वभूमी
मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) पाचव्या टप्प्यात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबईत सकाळच्या टप्प्यात सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मतदानाच्या रांगेत पाहायला मिळालं. मतदानाचा हक्क बजावा, जास्तीत जास्त मतदान करा, असं आवाहन राजकीय नेते, सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? याची आकडेवारी जाणून घेऊयात...
महाराष्ट्र सरासरी – 48.66 टक्के
भिवंडी 48.89 टक्के
धुळे -48.81 टक्के
दिंडोरी – 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
उत्तर मुंबई – 46.91 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 47.32 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के
दक्षिण मुंबई - 44.22 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के
नाशिक - 51.16 टक्के
पालघर – 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -