मुंबई: राज्यातील सर्वाधिक लक्ष्यवेधी असणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 53.40 टक्के मतदान झाल्यांच समोर आलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 63.71 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 62.18 टक्के मतदान झालं. सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झालं असून 45.68 टक्के मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे. 


तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11  लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे, 


लातूर - 55.38 टक्के 
सांगली - 52.56  टक्के
बारामती - 45.68 टक्के
हातकणंगले - 62.18 टक्के
कोल्हापूर -  63.71 टक्के
माढा - 50.00  टक्के
उस्मानाबाद -  52.78 टक्के
रायगड - 50.31 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  53.75 टक्के
सातारा -  54.11 टक्के
सोलापूर - 49.11   टक्के 


बारामतीमध्ये सर्वाधिक कमी मतदान


राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.68 टक्के मतदान झालं. इतर मतदारसंघांच्या तुलेनेत हे मतदान कमी असल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असून शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


कोल्हापूर आणि हातकणंगले आघाडीवर


राज्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात निवडणूक होत असून त्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झाल्याचं दिसतंय. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये 63.71 तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे. 


राज्यातील प्रमुख लढती


रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे.


धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत होत आहे. 


साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे. 


कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे. 


सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे.


माढ्यात भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत आहे. 


बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय सामना आहे.


हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील विरूद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. 


ही बातमी वाचा: