लातूर : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. आज (7 मे) एकूण 11 मतदासंघासाठी ही मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. हातकनंगले, सातारा, कोल्हापूर, लातूर, माढा, बारामती अशा महत्त्वाच्या जागांवर आज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. दरम्यान, या मतदानादरम्यान लातूरमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. लातूरमधील दावरी कन्या प्रशाला या बुथवर अनेक मतदारांची नावेच वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. या बुथवर अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


नेमका प्रकार काय?  


मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील गोदावरी कन्या प्रशाला बूथ क्रमांक 65 ते 76  या मतदान केंद्रावर आठ ते दहा लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असाच काहीसा प्रकार निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावातही समोर आला आहे. मागील तीस वर्षांपासून सुरेखा या गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय केंद्रावर मतदान करतात पण यावेळी त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. मतदार यादीत नावच नसल्यामुळे त्या यावेळी मतदानापासून वंचित राहिल्या आहेत. सुरेखा यांच्यासह या भागातील साधारण आठ ते दहा लोकांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे तेदेखील यावेळी मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. 


आधीच पडताळणी करायला हवी होती, म्हत निवडणूक अधिकारी निघून गेल्या


ही नावे मतदार यादीतनू का वगळण्यात आली, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.  लातूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या मतदान केंद्राला भेट देऊन तुम्ही आधीच याची पडताळणी करायला हवी, असे उत्तर मतदारांना दिले आणि त्या तेथून निघून गेल्या. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केला  जात आहे. मात्जेर दुसरीकडे लोक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आल्यावर त्यांना आपले नावच मतदार यादीत नसल्याचे समजत आहे. त्यामुळे या अशा प्रकारात नेमकी चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा : 


धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच चाकू हल्ल्यात एकाची हत्या, राजकीय वादाचं पर्यवसन हत्येमध्ये झाल्याने घटना


 शरद पवार मुद्दाम आजारी पडले? अजितदादांचा हा विचार हास्यास्पद; रोहित पवारांचं प्रत्युत्तर


दत्ता मामांनी शिवीगाळ केली, भेटीला आलेल्या सुप्रियांना आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले