पुणे : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी दिलेल्या धमकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार गटाकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यात भिगवणमधील बूथ 5 मध्ये अजित पवारांच्या सदस्याकडून मतदारांना इशारा आणि दमदाटी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतरही या गोष्टी सुरू असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला.


या संबंधित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, 'विरोधकांकडून उपस्थित असणाऱ्या सनी भिमराव तापकीर नावाच्या व्यक्तीकडून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना इशाऱ्याद्वारे दबाव आणून दमदाटी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नेमण्यात आलेला बूथ सदस्य प्रेम मनोज भोसले यांनी विरोधकांच्या या नियमबाह्य कृत्याची बाब वारंवार उपस्थित निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु उपस्थित यंत्रणांकडून कारवाईची कुठलीही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून मतदानाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सनी भिमराव तापकीर याच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई करण्यात यावी.'


 






रोहित पवारांकडून पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर


या आधीही बारामतीमध्ये पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवारांनी त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. अजित पवारांच्या कारखान्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा नातलग पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 


 






ही बातमी वाचा: