Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates: पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57 टक्के तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41 टक्के

Lok Sabha 5th phase voting LIVE : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचं सर्वांचं लक्ष आहे.

रोहित धामणस्करLast Updated: 20 May 2024 07:15 PM

पार्श्वभूमी

मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) पाचव्या टप्प्यात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी,...More

Mumbai Lok Sabha Election : कुलाबामध्ये ठाकरे- भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, राहुल नार्वेकरांच्या भेटीवेळी जोरदार घोषणाबाजी 

कुलाबा येथे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप आणि सेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. कुलाबा येथील म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रकार घडला. 


राहुल नार्वेकर मतदान केंद्रावर आले असता ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. सध्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती आहे.