Maharashtra Live Blog Updates: विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रतिक्रियेनंतर छावा संघटनेतून तीव्र भूमिका
लातूर : दादागिरी आणि जबरदस्ती चालणार नाही, असा इशारा शिवेंद्रराजें भोसले यांनी छावा संघटना इशारा दिला होता. याबाबत आता लातूरमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांना मानणारा मोठा वर्ग लातूरमध्ये आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या छावाबाबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया आल्यानंतर विजयकुमार घाडगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही गुंडगिरी करणार, जबरदस्ती करणार, मारही खाणार, मागे हटणार नाही. कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या पक्षाची आम्ही हुजरेगिरी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे प्रमाणे शेतकऱ्यांचे नुकसान ते आमचे नुकसान या नुसार आम्ही काम करतो. त्यामुळे राजेंनी असं म्हटलं तर त्यांना एकच उत्तर आहे. तुमच्याच घराण्याने घालून दिलेला वारसा आम्ही पुढे नेतोय, असे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी म्हटले आहे.
नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मालेगावात 'नारीशक्ती'ने काढला मोर्चा
मालेगाव : येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगावात "नारीशक्ती" मोर्चा काढण्यात आला. गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी शंखनाद करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. तशा आशयाचे निवेदन यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.























