Maharashtra Live Blog Updates: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात; 4 ते 5 गाड्यांची जोरदार धडक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शनं करत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कोणकोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारीसाठी कोण तडजोड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी, 2 डिसेंबरला मतदान पार पडणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
भूममध्ये भव्य शक्ती प्रदर्शन, तानाजी सावंत पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल
भूम मध्ये भव्य मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शनासह तानाजी सावंत पॅनल चा उमेदवारी अर्ज दाखल
आलमप्रभू शहर विकास आघाडी सावंतांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या मैदानात
आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात सर्वपक्षीय पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात
Anc: धाराशिवच्या भूम नगर परिषदेमध्ये मोटरसायकल रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शनासह तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात आलमप्रभू शहर विकास आघाडी उमेदवारी अर्ज दाखल केला. ओम नगरपरिषदेत तानाजी सावंत यांच्या फायनल विरोधात सर्वपक्षीय पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः सावंत मैदानात उतरल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.
मनमाड नगरपरिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनाचा एकला चलो चा नारा..
- मनमाड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनाचा ( उद्धव ठाकरे ) एकला चलो चा नारा..
- थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल..
Anchor - मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) एकला चलो चा नारा देत थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण नाईक यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला..महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी ( शरद पवार ) प्रतिसाद देत नसल्याचे पाहून उबाठा ने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला...























